Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»छत्रपती संभाजी नगर»‘सरकार मायबाप’ कवितेतून विजय मोकळे करंजगावकर यांचा व्यवस्थेवर घणाघात!
छत्रपती संभाजी नगर

‘सरकार मायबाप’ कवितेतून विजय मोकळे करंजगावकर यांचा व्यवस्थेवर घणाघात!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

परिवर्तनवादी साहित्य संमेलनात कवितेला उत्स्फूर्त दाद; मान्यवरांच्या हस्ते सन्मान

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध कवी, गायक व शाहीर विजय मोकळे करंजगावकर यांच्या ‘सरकार मायबाप’ या कवितेने विशेष लक्ष वेधून घेतले. दुष्काळ, सामाजिक विषमता, सर्वसामान्यांच्या व्यथा आणि व्यवस्थेच्या वर्चस्वावर परखड भाष्य करणाऱ्या या कवितेला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. प्रभावी सादरीकरणाबद्दल मोकळे यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) तापडिया नाट्यगृहात आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्य संयोजक रतनकुमार साळवे आणि कार्याध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली.

संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. त्यानंतर झालेल्या परिसंवादात परिवर्तनवादी साहित्य, सामाजिक वास्तव आणि वैचारिक चळवळींच्या दिशेवर विचारमंथन झाले. अध्यक्षीय भाषणात श्रीपाल सबनीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आचरणात आणण्याचे आवाहन केले.

सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात विजय मोकळे यांनी ‘सरकार मायबाप’ ही कविता सादर केली. दुष्काळाने त्रस्त शेतकरी, आर्थिक-सामाजिक विषमता, सामान्य माणसाला न्याय मिळवताना येणाऱ्या अडचणी आणि व्यवस्थेच्या हुकूमशाही प्रवृत्तीकडे होणारी वाटचाल या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या कवितेतून भाष्य केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रस्थापित व्यवस्थेतील विसंगती त्यांनी परखड शब्दांत मांडल्या.

कवितेतील सामाजिक जाणीव, आक्रमक सादरीकरण आणि सामान्यांच्या वेदनांना आवाज देणाऱ्या शब्दरचनेमुळे सभागृहात वारंवार टाळ्यांचा कडकडाट झाला. कवी अनंत राऊत यांनीही टाळ्या वाजवून कवितेला दाद दिली.

या प्रभावी सादरीकरणानंतर साहित्यिक वाठोरे सर, कवी अनंतराव राऊत आणि संमेलनाचे मुख्य संयोजक रतनकुमार साळवे यांच्या हस्ते विजय मोकळे करंजगावकर यांना ट्रॉफी व शाल देऊन गौरविण्यात आले.

सन १९९३ पासून सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विजय मोकळे यांनी कविता, गायन, शाहिरी आणि व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची परंपरा जपली आहे. ‘सरकार मायबाप’ या कवितेच्या माध्यमातून त्यांनी परिवर्तनवादी साहित्याचे सामर्थ्य अधोरेखित करत सामान्य माणसाच्या हक्कांचा आणि न्यायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.

Post Views: 50
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न!
Next Article नगरसचिव नियुक्तीप्रकरणी चौकशीची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या शिलेदार मंचावरून हजारो कलाकारांनी दाखवला आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध

September 15, 2026

‘आदर्श शाळे’च्या यशाला सलाम!

September 11, 2026

वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!

September 7, 2026

महाकवी वामनदादांच्या लोककाव्याची परंपरा जपणारा जनमाणसांचा लोककवी : प्रशांत मोरे

August 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?