Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»लेख....»पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?
लेख....

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विशेष लेख : दिवाळी लक्ष्मीपूजन व सामाजिक भान

फक्त कागदी मुहूर्तावर नव्हे, तर रोजच्या जगण्यात जिवंत स्त्रीचा सन्मान करणे म्हणजेच खरे लक्ष्मीपूजन!

लेखक….दिलीप डाळीमकर (पत्रकार व स्तंभलेखक)

दिवाळी सण चालू झाला आहे. घराघरांमध्ये रोषणाई, फराळाचा घमघमणारा सुवास आणि नवीन कपड्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘लक्ष्मीपूजन’. यावर्षी लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबर रोजी रविवारी आले असून, संध्याकाळी ६:०० ते ८:३३ या वेळेत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त पाहून आणि पंचांगोक्त वेळा पाळून घरोघरी आणि दुकानांमध्ये दप्तरे, वह्या व सोन्या-नाण्यांची पूजा केली जाईल.

श्रद्धा आणि जिवंत लक्ष्मीचा समतोल

हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि परंपरेनुसार लक्ष्मीपूजन, दप्तराचे पूजन आणि देवीची उपासना करणे हे आपले श्रद्धास्थान आहे आणि ते आपण मनोभावे केलेच पाहिजे. परंपरेचा मान राखणे आणि संस्कृती जोपासणे हे आपल्या आचार-विचारांचा भाग आहे. परंतु, या धार्मिक विधिंचे पालन करत असताना, आपल्या घरात, परिसरात आणि समाजात अहोरात्र कष्ट करणारी ‘खरी जिवंत लक्ष्मी’ ही माता, पत्नी, बहीण किंवा मुलीच्या रूपाने आपल्या अवतीभवती वावरत असते, तिच्याप्रती असलेला आपला खरा आदर आणि सन्मान कुठे तरी मागे पडतो का, याचे आत्मपरीक्षण करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

वर्षातून एकदा येणाऱ्या एका संध्याकाळी मूर्तीची किंवा कागदाची पूजा करून संपत्तीची कामना करणे आणि उरलेल्या ३६५ दिवस याच घरात स्त्रीला दुय्यम वागणूक देणे, तिच्या कष्टाची व त्यागाची अवगणना करणे, तिला निर्णयस्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे म्हणजे केवळ कर्मकांड ठरते. धर्म आपल्याला श्रद्धा आणि संस्कृती शिकवतो, तर तीच खरी संस्कृती आपल्याला घरातला व समाजातील स्त्रीचा सन्मान करण्याची आणि तिच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्याची महान शिकवण देते.

शिवछत्रपतींचा आदर्श आणि स्त्री-सन्मान

या संदर्भात आपल्या डोळ्यांसमोर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंडित व प्रेरणादायी आदर्श उभा आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या संपूर्ण स्वराज्य स्थापनेच्या काळात स्त्रीशक्तीचा कधीही अवमान होऊ दिला नाही, तर राज्याभिषेकापासून ते प्रत्येक थोर प्रसंगी स्त्रियांना आदराचे स्थान दिले. परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण त्यांनी दिली आणि स्वराज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी व स्वाभिमानासाठी कडक कायदे अमलात आणले.

राजमाता जिजाऊसाहेबांच्या सुसंस्कारातून, दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनामुळेच या पावन मातीत हिंदवी स्वराज्य उभे राहिले. याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, क्रांतीज्योती रमाई आंबेडकर, माता रमाई आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व प्रज्ञावान महिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी, सामाजिक विषमताशी प्रचंड लढा देत हा देश, शिक्षणव्यवस्था आणि समाज सुधारला. ज्या मातृशक्तीने आपल्या अफाट त्यागाने, अजोड कर्तृत्वाने आणि क्रांतिकारी विचारांनी संपूर्ण समाजाची दिशा बदलली, त्या जिवंत शक्तीचा यथोचित सन्मान करणे, त्यांचे विचार आचरणात आणणे म्हणजेच खऱ्या अर्थाने संस्कृतीचा विस्तार करणे होय.

सन्मानाची पणती आणि दीपोत्सवाचा खरा संदेश

वर्षभरातून केवळ एका दिवशी दारासमोर रांगोळी काढून, फटाके फोडून किंवा हिशोबाच्या वह्यांवर कुंकू वाहून लक्ष्मी प्रसन्न होत नसते. जोपर्यंत आपण आपल्या कुटुंबातील, नात्यातील आणि परिसरातील प्रत्येक स्त्रीला सुरक्षित, स्वतंत्र, भयमुक्त आणि सन्मानाचे वातावरण देत नाही, तोपर्यंत केलेले सर्व धार्मिक पूजन अपूर्णच मानले पाहिजे. केवळ सोन्या-नाण्याच्या किंवा पैशांच्या भौतिक मोहात न अडकता, घरातल्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे कर्तव्य ठरते.

पंचांगातील मुहूर्तावर लक्ष्मीपूजन नक्कीच करावे, पण त्यासोबतच आपल्या घरात आणि समाजातील स्त्रीच्या स्वाभिमानाचा दिवा सदैव तेजाळू द्यावा. जेव्हा घरातल्या प्रत्येक स्त्री सन्मानाने, सुरक्षेत आणि सुखासमाधानाने स्वाभिमानाने जगेल, तेव्हाच आपली संस्कृती खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. खरा दीपोत्सव हा केवळ घराची रोषणाई करण्यात नसून मनातील अंधार आणि स्त्री-असन्मानाची भावना नष्ट करण्यात आहे.  

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!
Next Article पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

“आनंदाश्रू कौतुकाचे – सावित्रीचा वसा घेऊन”

August 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?