Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कासव आणि माशांच्या मृत्यूची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी: निगडी येथील गणेश तलावात मोठ्या संख्येने कासव आणि मासे मृत अवस्थेत आढळल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तलावाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून तलावातील जलचरांचे संरक्षण आणि तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी महानगरपालिकेचे सभागृहनेते प्रशांत शितोळे आणि नगरसदस्य शत्रुघ्न (बापू) काटे उपस्थित होते.

निगडी परिसरातील गणेश तलाव हा नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण असून, परिसरातील पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेच्या दृष्टीनेही त्याचे विशेष महत्त्व आहे. मात्र, तलावात कासव आणि मासे मृत अवस्थेत आढळल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता, साचलेला गाळ आणि इतर संभाव्य कारणांची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी निवेदनात नमूद केले.

तलावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून जलचरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधावे, तलावातील साचलेला गाळ काढून स्वच्छता करावी तसेच तलावाच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि आवश्यक देखभाल व्यवस्था निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याची विनंती केली. तलावाचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता या प्रश्नाकडे केवळ स्वच्छतेचा विषय म्हणून न पाहता जलचरांचे संरक्षण आणि नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन या दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि जलचरांचे अस्तित्व टिकवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेश तलावा सह इतर गोष्टींचे मूळ नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समृद्धी जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू”

– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
Next Article महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026

महापालिकेच्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना ३० हजारांचे दिवाळी बक्षीस मिळणार!

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?