Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न!
पुणे ग्रामीण

सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अमृतेश्वर भैरवनाथ मंदिरात रंगला सोहळा

पुणे/लोणीभापकरः….. येथील अमृतेश्वर भैरवनाथ मंदिरात मराठेशाहीत आपल्या पराक्रमाने इतिहास गाजवणारे मातब्बर सरदार गोरखोजी भापकर यांच्या अठराव्या शतकातील ऐतिहासिक शिक्क्यांचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनावरण करण्यात आले. या शिक्क्यांचे संशोधन पुणे येथील दख्खन इतिहास संशोधन संथेचे संशोधक निखील भापकर व प्रदीप भापकर यांनी पुणे येथील पुरालेखागारातून केले आहे.

मंदिरातील घट उठवून, देवाचा छबिना आणि देवाची आरती झाल्यानंतर शिक्क्यांच्या अनावरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या वेळी गोरखोजी भापकर यांचा” श्री अमृतेश्वर चरणी तत्पर गोरखोजी भापकर निरंतर” असा गोलाकार आणि मोर्तब सूद” हा लेखनसीमेचा षटकोनी असे दोन शिक्के प्रकाशित करून, त्यांचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मु. सा. काकडे महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक प्रा. दत्तात्रय जगताप यांनी कागदपत्रांवरील शिक्क्यांचे महत्त्व, प्रकार आणि त्यांच्या वापराची वैशिष्टे समजावून सांगितली. प्रा. जगताप म्हणाले की, “छत्रपतींच्या परवानगीशिवाय शिक्का व मोर्तब कोणालाच वापरता येत नव्हता. अर्थात शिक्का वापरणारा सरदार व त्याचे घराणे महत्त्वपूर्ण मानले जात असे. त्यामुळे भापकर घराण्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. या शिक्क्यातून गोरखोजी भापकरांचा श्री अमृतेश्वराप्रति असलेला समर्पित भक्तीभाव व्यक्त होतो. गोरखोजी भापकर हे छत्रपती थोरले शाहू महाराजांचे मातब्बर सरंजामी सरदार असून त्यांची पाच हजार स्वारांची फौज होती. तसेच त्यांना बीड, माहूर व पाथरी येथील सरदेशमुखीच्या सरंजामाची सनद देण्यात आली होती. अनेक लष्करी मोहिमा व लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजविला होता. अमृतेश्वर आणि भैरवनाथ यांचा सहसंबंध जसा काशी येथे आहे तसाच तो लोणी येथेदेखील असून मराठे कालखंडात या देवस्थानला इनाम देण्यात आले होते. तसेच या ठिकाणी गोतसभा होत असून दिव्य पार पाडली जात.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप भापकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर भापकर यांनी केले. ऐतिहासिक शिक्क्यांच्या या अनावरण सोहळ्यासाठी माजी सरपंच हनुमंतराव भापकर, दारासिंह भापकर, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे संचालक रवींद्र भापकर, शिवसेना (उबाठा) चे तालुकाध्यक्ष हनुमंतराव भापकर, पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, दख्खन इतिहास संशोधन संथेचे विश्वस्थ अतुल रणवरे, उदयसिंह भापकर, जयदीप भापकर, शिवराम भापकर, सुनिलराजे भोसले इत्यादी मान्यवर व लोणी भापकर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनावरण सोहळ्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Post Views: 20
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन सोहळा; अमर साबळे यांच्या हस्ते ‘सोनं लुटण्याचा’ प्रारंभ
Next Article ‘सरकार मायबाप’ कवितेतून विजय मोकळे करंजगावकर यांचा व्यवस्थेवर घणाघात!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

उजनी प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!

October 31, 2026

सासवड शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा!

October 31, 2026

शिरूरमध्ये सशस्त्र चोरट्याचा गोळीबार; व्यापारी गंभीर जखमी

October 16, 2026

समर्थ कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?