Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन सोहळा; अमर साबळे यांच्या हस्ते ‘सोनं लुटण्याचा’ प्रारंभ
पिंपरी चिंचवड

यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन सोहळा; अमर साबळे यांच्या हस्ते ‘सोनं लुटण्याचा’ प्रारंभ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (प्रतिनिधी) दिनांक २१ ऑक्टोबर २०२६:- दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात सीमोल्लंघन,पथ संंचलन आणि सोनं लुटण्याचा पारंपरिक सांस्कृतिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा प्रारंभ माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते (दि.२०)करण्यात आला. या सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी शेकडो बंधू भगिनींनी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी ३ वाजता सीमाउल्लंघन कार्यक्रम तसेच पथ संंचलन राष्ट्रीय श्रमिक आघाडी तसेच संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादितच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.पथसंचालनाचे उद्घाटन मा.खासदार श्री अमरजी साबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन संघटनेचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केले होते.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅलीला सुरुवात झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुतळा येथे महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला तसेच स्वामींचे मंदिरात स्वामींना पुष्पहार अर्पण करून, बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.गंगानगर ते अक्षय सोसायटी YCMH या रस्त्यांच्या सीमाउल्लंघन करण्यापूर्वी माजी नगरसेवक श्री बबनराव गाढवे, भाजपा नेते किरणजी सुवर्णा, भाजप मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे, भाजप नेते नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश भाऊ पाटील, शेखर भाऊ पाटील, संदीप नाईक इत्यादी कार्यकर्त्यांनी मा.खासदार अमरजी साबळे व श्री यशवंतभाऊ भोसले यांना श्रीफळ देऊन स्वागत केले.

त्यानंतर वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर यांच्या सीमारेषेवरील गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. दोन्ही परिसरांतील नागरिकांनी एकत्र येत श्री गणेश मंदिरात भक्तिभावाने सोनं लुटण्याच्या परंपरेत सहभाग घेतला. आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा व्यक्त करण्याच्या या परंपरेतून परस्परांतील स्नेह, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.विशेष म्हणजे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची ६ वर्षाची नात लिनेशा हिने प्रथमच सोने लुटणे व पथसंंचलन मध्ये सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, विजयादशमीच्या निमित्ताने दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा सीमोल्लंघनाच्या परंपरेतून मिळते. यशवंतभाऊ भोसले यांनी वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर परिसरात ही परंपरा सुरू करून सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात या परिसराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या उपक्रमाची निश्चितच आठवण राहील. यशवंतभाऊ भोसले यांनी यापूर्वी परिसरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडीची परंपराही सुरू केली आहे. या दिंडीत परिसरातील नागरिक, वारकरी आणि भक्तिभावाने सहभागी होणारे भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.सीमोल्लंघन आणि आषाढी दिंडी या दोन्ही उपक्रमांमधून स्थानिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच नागरिकांमध्ये एकोपा वाढविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आपल्या मनोगतात सीमोल्लंघनाच्या परंपरेमागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले. पूर्वी ग्रामीण भागात दोन गावांतील नागरिक सीमारेषेवर एकत्र येऊन गळाभेट घेत, एकमेकांना शुभेच्छा देत आणि मंदिरात जाऊन सोनं लुटण्याची परंपरा पाळत असत. याच परंपरेचे पुनरुज्जीवन संत तुकाराम नगरमध्ये करण्याचा प्रयत्न आहे.

चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे,अनिकेत भोसले,दीपक शेठ पाटील, दत्ताजी गायकवाड, आदित्य देशपांडे,राहुलजी शितोळे,अंकुशजी वाघमारे, अप्पू जी नायर,ओमकारजी जोकारे, मानसी ताई देशपांडे, लताताई पाटील, चंद्रकांत भालेराव,शालन ताई महापुरे,योगेंद्रजी आरवडे,कैलासजी गव्हाणे,शिरीषजी सासवडे, सतीशजी सासवडे, श्रेयस करे, विनायक जी निकम,जेवियर अँथोनी किसन भाग्यवंत, मल्लेषजी कोरवी, इस्मत सय्यद,दगडू जी लेंडे, रावसाहेब पाबळे, सुदामजी गायकवाड,आप्पासाहेब माने, नंदकिशोर जोशी, महेश जी भुते,आरतीताई पराळे, उषाताई टाकळकर, सुधाकरजी शिंदे,अंकुशजी गायकवाड, फौजदार गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड, राजाराम भोंडवे, संतोषी चौधरी, सना शेख, दत्तात्रय झरकर, अमोल घोरपडे, प्रियाताई घोरपडे, राजनीताई मगर इत्यादी प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऐश्वर्यंम सोसायटीत विजयादशमीनिमित्त विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत उत्साहात शस्त्रपूजन संपन्न
Next Article सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?