Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»शिरूरमध्ये सशस्त्र चोरट्याचा गोळीबार; व्यापारी गंभीर जखमी
पुणे ग्रामीण

शिरूरमध्ये सशस्त्र चोरट्याचा गोळीबार; व्यापारी गंभीर जखमी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 16, 2026Updated:October 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वडिलांच्या बचावासाठी १२ वर्षीय मानवीचा चोरट्यावर प्रतिहल्ला; आईने हिसकावले रिव्हॉल्व्हर, मायलेकींच्या धाडसाचे कौतुक

पुणे ग्रा./शिरूर, दि. १७ : शिरूर शहरातील रामलिंग रोड परिसरातील आनंद सोसायटीमध्ये सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार केला. जबरी चोरीला विरोध करणारे व्यापारी उमेश छाजेड यांच्या पायावर चोरट्याने गोळी झाडली. या हल्ल्यात उमेश छाजेड गंभीर जखमी झाले, तर त्यांची १२ वर्षीय मुलगी मानवी किरकोळ जखमी झाली. वडिलांच्या बचावासाठी मानवीने चोरट्यावर जोरदार प्रतिहल्ला केला, तर आई प्रिया छाजेड यांनी चोराच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले. मायलेकींच्या धाडसामुळे चोरट्याला पळ काढावा लागला. या थरारक घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.

पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित चोरटा रात्री दोन वाजल्यापासून आनंद सोसायटी परिसरात फिरून घरांची पाहणी करत होता. त्याने शेजारील सोसायटीतही चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने प्रथम ओस्तवाल यांच्या घरात चोरी केली आणि पुढे उमेश छाजेड यांच्या घरात प्रवेश केला.

उमेश छाजेड हे कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, हातात रिव्हॉल्व्हर घेतलेला चोरटा दिसला. उमेश यांनी त्याला विरोध केल्याने दोघांमध्ये झटापट सुरू झाली. आवाज ऐकून पत्नी प्रिया आणि मुलगी मानवी घटनास्थळी धावून आल्या.

वडिलांवर चोरटा हल्ला करत असल्याचे पाहताच मानवीने धाडसाने त्याच्यावर प्रतिहल्ला केला. याचवेळी चोरट्याने उमेश यांच्या पायावर गोळी झाडली. गोळी पायातून आरपार गेल्याने ते गंभीर जखमी झाले. पती जखमी होऊन पडलेले असतानाही प्रिया यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले. मानवीचा प्रतिकार सुरूच असल्याने चोरट्याने स्वतःची सुटका करून घेत अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाजवळ रिव्हॉल्व्हर, संशयिताचे कपडे आणि चप्पल आढळल्याची माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी उमेश चंदनमल छाजेड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरी, गोळीबार, जीवघेणा हल्ला आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी आढळलेली मोटारसायकल शिरूरमधील एका व्यापाऱ्याची चोरीस गेलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. याच मोटारसायकलचा वापर करून १५ ऑक्टोबर रोजी पहाटे भाजी बाजार परिसरात एका महिलेच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. या दोन्ही घटनांचा परस्परसंबंध तपासला जात आहे.

पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.

आरोपीला अटक करण्यासाठी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

“१२ वर्षीय मानवी छाजेड हिने संकटाच्या वेळी दाखवलेला प्रतिकार कौतुकास्पद आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत”

……उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरस्त्यावरील रेलींग व दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी मैलाशुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर
Next Article गणेशोत्सवात सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

उजनी प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!

October 31, 2026

सासवड शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा!

October 31, 2026

सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न!

October 21, 2026

समर्थ कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?