Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»उजनी प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!
पुणे ग्रामीण

उजनी प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मारुती भापकर, काशिनाथ नखाते यांचा आंदोलनाला पाठिंबा; जनसुनावणी होईपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आश्वासन 

पुणे ग्रा. प्रतिनिधी: उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्प, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि एआय डेटा सेंटरसारख्या प्रकल्पांविरोधात शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. सोलापूर-पुणे महामार्गावरील रांजणी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे झालेल्या या रस्ता रोको आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमधील जनचळवळींच्या वतीने माजी नगरसेवक मारुती भापकर आणि कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सक्रिय सहभाग घेत पाठिंबा दिला.

आमदार रोहित पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील आमदार, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते.

लाखो शेतकरी, मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न

यावेळी बोलताना मारुती भापकर म्हणाले की, उजनी धरण क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांमुळे शेती, जलसंपत्ती, पर्यावरण आणि स्थानिक रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. या प्रकल्पांमुळे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील लाखो शेतकरी, मच्छीमार, आदिवासी कातकरी आणि शेतमजुरांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची शेती, कष्टकऱ्यांचा रोजगार आणि पर्यावरणाचे नुकसान होता कामा नये. उजनी धरणाच्या अस्तित्वावर आणि परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका भापकर यांनी मांडली.

जनसुनावणी होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आश्वासन

प्रस्तावित प्रकल्पांमुळे उजनीच्या जलसंपत्तीवर, शेतीवर आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शासनाने गावागावात जनसुनावणी घेऊन स्थानिक नागरिकांची मते जाणून घ्यावीत, अशीही मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान उजनी धरण प्रकल्पाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आले. गावागावात जनसुनावणी घेण्यात येईल आणि तोपर्यंत संबंधित प्रकल्पांचे काम बंद ठेवण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

उजनी धरण परिसरातील शेती, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी-कष्टकऱ्यांनी एकजूट दाखवत शासनाचे लक्ष वेधले आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंविधान शिल्प हटविल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा दहावा दिवस; १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय निर्धार सभा!
Next Article पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सासवड शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा!

October 31, 2026

सरदार गोरखोजी भापकर यांच्या ऐतिहासिक शिक्क्यांचे लोणी भापकर येथे अनावरण संपन्न!

October 21, 2026

शिरूरमध्ये सशस्त्र चोरट्याचा गोळीबार; व्यापारी गंभीर जखमी

October 16, 2026

समर्थ कॉलेजमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?