Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»संविधान शिल्प हटविल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा दहावा दिवस; १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय निर्धार सभा!
पिंपरी चिंचवड

संविधान शिल्प हटविल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा दहावा दिवस; १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय निर्धार सभा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सांगवीत संविधान सन्मानासाठी एल्गार; कायदेशीर लढ्याची पुढील दिशा ठरणार

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी), : सांगवी येथील संविधान चौकातील संविधान शिल्प हटविल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि समविचारी संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. संविधानाचा सन्मान, न्याय आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार, १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय ‘संविधान सन्मान निर्धार सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

सांगवी येथील संविधान चौकात रविवारी सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. आंदोलनाचा आढावा घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याबरोबरच संविधान शिल्प हटविल्याप्रकरणी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याबाबत सर्वांना सोबत घेऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे.

 “संविधान चौकातील आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. आंदोलनाचा दहावा दिवस असून, उद्या सर्वपक्षीय निर्धार सभेच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. संविधानाचा सन्मान आणि नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल.”

…..नरेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष, कॉग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड 

दरम्यान, आंदोलनस्थळी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

संविधान शिल्प हटविल्याच्या प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा सर्वांच्या सहमतीने ठरविण्यात येणार आहे. या सभेला आंबेडकरी चळवळीतील नेते, सर्वपक्षीय नेते, पुरोगामी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, संविधानप्रेमी नागरिक तसेच बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभ्रष्टाचाराचा महापालिकेत हैदोस! दोषींवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलनाचा भडका!
Next Article उजनी प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा एल्गार!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?