Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»छत्रपती संभाजी नगर»वैजापूरच्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू द्या
छत्रपती संभाजी नगर

वैजापूरच्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू द्या

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गंगापूरच्या धर्तीवर लाभ देण्याची आजाद समाज पार्टीची मागणी; प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आवाहन

वैजापूर, प्रतिनिधी विजयकुमार मोकळे करंजगावकर : प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच अन्य शासकीय घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी आजाद समाज पार्टी (का.)च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत १७ ऑगस्ट रोजी नायब तहसीलदार कुमावत तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जायेभाय यांना निवेदन देण्यात आले.

गंगापूरच्या धर्तीवर वैजापूरलाही लाभ द्या!

गंगापूर तालुक्यातील सुमारे ४०० घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर वैजापूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनाही तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर व गंगापूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याबाबत तहसील प्रशासनाला आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गंगापूरप्रमाणे वैजापूरमधील पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी भूमिका पक्षाने मांडली.

वाळूच्या वाढत्या दरामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत

घरकुल बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता असते. मात्र वाळूच्या वाढलेल्या किमतीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून अनेकांचे घरकुल बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शासनाने पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

विजयकुमार मोकळे करंजगावकर यांचा पाठपुरावा

सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लाभार्थ्यांना वाळूसाठी अनावश्यक कार्यालयीन हेलपाटे मारावे लागू नयेत, कोणतेही अनधिकृत शुल्क आकारले जाऊ नये, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार लाभार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध करून दिलेल्या वाळूचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली.

प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढा

वैजापूर तालुक्यातील विविध गावांमधील घरकुल लाभार्थ्यांचे वाळू मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे प्रस्ताव तातडीने निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“गंगापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचा लाभ मिळत आहे. त्याच धर्तीवर वैजापूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनाही तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी,” 

……विजय शिनगारे,जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी.

Post Views: 21
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरभणीत ₹१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगारांची निर्मिती
Next Article ३५०० किमीचा खडतर काश्मीर-लडाख प्रवास; प्रणय बांदिवडेकर यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!

September 7, 2026

महाकवी वामनदादांच्या लोककाव्याची परंपरा जपणारा जनमाणसांचा लोककवी : प्रशांत मोरे

August 20, 2026

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर गायब; कर्मचाऱ्यांच्या अरेरावीने रुग्ण त्रस्त!

August 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?