Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»परभणीत ₹१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगारांची निर्मिती
मनोरंजन

परभणीत ₹१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगारांची निर्मिती

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘इन्व्हेस्ट इन परभणी’ परिषदेत १६२ सामंजस्य करार; दसऱ्यापर्यंत नवीन उद्योगांच्या भूमिपूजनाचा निर्धार

परभणी, दि.१८ ऑगस्ट २०२६ : परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, ‘इन्व्हेस्ट इन परभणी २०२६’ या गुंतवणूक परिषदेत तब्बल ₹१,६२२ कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे १६२ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या गुंतवणुकीतून स्थानिक युवकांसाठी सुमारे १५,६१७ रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित या परिषदेत नवीन उद्योगांच्या उभारणीला दसऱ्यापर्यंत सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योजकांना मोठी संधी मिळेल आणि परभणीच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळेल, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री व पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

परिषदेला खासदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, सहायक आयुक्त संजय भुरेवाल व अमोल बाळे, सहायक उद्योग अधिकारी प्रभाकर वाटाणे, भावना बोर्डीकर यांच्यासह उद्योजक निलेश त्रिभुवन, धिरेन गिलानी, सुषमा मोरधनिया, बाळासाहेब गीते आणि संतोष एकलारे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिषदेला शुभेच्छा दिल्या.

उद्योग भवन आणि सिंगल-विंडो मंजुरी

परभणीला नवीन नियोजन भवनासोबतच स्वतंत्र उद्योग भवन उभारण्यात येणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक विविध परवानग्या व मंजुरी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत सिंगल-विंडो प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात Centre for Invention, Innovation, Incubation and Training (CIIIT) केंद्रही उभारण्यात येणार आहे. उद्योग भवनाच्या माध्यमातून प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन ते वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

सौरऊर्जा, प्रक्रिया उद्योग आणि कौशल्य विकासावर भर

परभणी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अक्षय ऊर्जानिर्मितीसाठी अनुकूल असल्याने महाराष्ट्राच्या सौरऊर्जा क्षेत्रातील नेतृत्वात परभणीने महत्त्वाची भूमिका बजावावी, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेलबियांचे उत्पादन होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. अकुशल कामगारांना प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार केले जाईल. स्थानिक कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला मूल्यवर्धन देत जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुमारे ८० हजार नोंदणी झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

₹५०० कोटी ई-कॉमर्स, ₹१,००० कोटींचा अन्नप्रक्रिया उद्योग

उद्योजक सुनील घैसासी यांनी ई-कॉमर्स क्षेत्रात सुमारे ₹५०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. उद्योजक धिरेन गिलानी यांनी पुढील पाच वर्षांत अन्नप्रक्रिया क्षेत्रात सुमारे ₹१,००० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून, त्यातून सुमारे १० हजार स्थानिक रोजगार निर्माण करण्याचे नियोजन आहे.

‘मे. पालवी अ‍ॅग्री’चे नितीन इंगोले यांनी ई-कॉमर्स क्षेत्रात ₹७५ कोटींची गुंतवणूक जाहीर केली. निलेश त्रिभुवन यांनी शेळीपालन क्षेत्रातील गुंतवणुकीची माहिती दिली.

‘शेतातून कंपनीत आणि कंपनीतून जागतिक बाजारपेठेत’

खासदार रामराव वडकुते यांनी परभणीत गुंतवणूक करण्यासाठी इतर राज्यांतील उद्योजकही उत्सुक असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पारंपरिक पद्धतींपलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन व्यावसायिक मॉडेल स्वीकारण्याचे आवाहन उद्योजकांना केले. शेतातून कंपनीत आणि कंपनीतून जागतिक बाजारपेठेत उत्पादन पोहोचविणे हे परभणीचे उद्दिष्ट असावे, असे त्यांनी सांगितले.

कृषी प्रक्रिया उद्योग, वेअरहाउसिंग, कोल्ड स्टोरेज, पर्यटन तसेच उद्योग क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग यावरही त्यांनी भर दिला.

उत्पादकांनी परभणीतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसाठी भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच ई-कॉमर्स बाजारपेठांवर नोंदणी करावी, असे सुषमा मोरधनिया यांनी सांगितले. वसमत हळदीच्या धर्तीवर परभणीतील इतर उत्पादनांनाही स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी मराठवाड्यात औद्योगिक विकासासाठी गुंतवणूकपूरक वातावरण निर्माण होत असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मनोळीकर यांनी केले, तर अनुप शुक्ला यांनी आभार मानले.

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे आवाहन

“आपण कल्पना केलेला परभणी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करून प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

“स्थानिक उत्पादनाला मूल्यवर्धन देणे, हाच परभणीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा मार्ग आहे.”

जिल्हाधिकाऱ्यांचा विकासाचा मंत्र

“शेतातून कंपनीत आणि कंपनीतून जागतिक बाजारपेठेत — हेच परभणीचे ध्येय असले पाहिजे.”

 

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतिरंग्याला मानवंदना देत देशाच्या अखंडता, एकता आणि सार्वभौमत्वासाठी योगदान देण्याचा मानवाधिकार संघटनेचा संकल्प
Next Article वैजापूरच्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू द्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून; आरोपी पतीला कर्नाटकातून २४ तासांत अटक

September 7, 2026

नऊ जीव गेले, तरी प्रशासन गप्पच! मोशी दुर्घटनेतील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न?

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?