Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»नऊ जीव गेले, तरी प्रशासन गप्पच! मोशी दुर्घटनेतील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न?
मनोरंजन

नऊ जीव गेले, तरी प्रशासन गप्पच! मोशी दुर्घटनेतील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अँटनी लारा कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर रिपब्लिकन सेनेचे गंभीर सवाल

पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै २०२६ रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ सफाई कामगारांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेला दीड महिना उलटूनही जबाबदार व्यक्तींवर ठोस कारवाई का झाली नाही? प्रशासन कोणाला वाचवत आहे?, असा थेट सवाल उपस्थित करत रिपब्लिकन सेनेने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.

दुर्घटनेप्रकरणी अँटनी लारा कंपनीचे मालक, संचालक तसेच संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पानपाटील यांच्या म्हणण्यानुसार, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीत संबंधित इमारतीस केवळ तळमजल्याची परवानगी असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यावर आणखी दोन मजले उभारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे अतिरिक्त बांधकाम कोणाच्या परवानगीने झाले? बांधकाम आराखडा कोणी मंजूर केला? संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी झाली होती का? संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का?, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

‘केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण दडपू नका’

या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करू नये. कंत्राटदार कंपनीचे मालक-संचालक, वरिष्ठ व्यवस्थापन, अभियंते, पर्यवेक्षक तसेच महापालिकेतील संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, १६ जुलै रोजीच या दुर्घटनेप्रकरणी फौजदारी कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ठोस कारवाई किंवा साधे लेखी उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप पानपाटील यांनी केला आहे. नऊ कामगारांचे जीव गेल्यानंतरही प्रशासनाची ही उदासीनता नेमकी कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला.

उच्चस्तरीय तांत्रिक चौकशीची मागणी

इमारतीची बांधकाम गुणवत्ता, संरचनात्मक स्थैर्य, मंजूर आराखडा, स्ट्रक्चरल डिझाइन, बांधकामावर झालेली देखरेख, सुरक्षा उपाययोजना, बांधकाम परवानग्या आणि कथित अतिरिक्त दोन मजल्यांची वैधता यांची स्वतंत्र व उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी. चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पद, पैसा, राजकीय वजन किंवा कोणत्याही प्रकारच्या दबावामुळे दोषींना संरक्षण मिळू नये, असा इशाराही रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

१५ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तसेच निवेदनकर्त्यांना केलेल्या कारवाईची लेखी माहिती देण्यात यावी. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर १५ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा गुलाब पानपाटील यांनी दिला आहे.

यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष उबाळे आणि सरचिटणीस आनंद नरवडे यांनीही प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पवना धरणावर जलपूजन
Next Article एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून; आरोपी पतीला कर्नाटकातून २४ तासांत अटक

September 7, 2026

परभणीत ₹१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगारांची निर्मिती

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?