Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ७१.७२ ग्रॅम एम.डी. व १०८.७३ ग्रॅम अफिमसह ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची अवैध विक्री व तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम ७२० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) आणि १०८ ग्रॅम ७३० मिलीग्रॅम अफिम, दोन मोबाईल, डिजिटल वजनकाटा आणि दुचाकी असा एकूण ४ लाख ३० हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पथके तयार केली होती.

दरम्यान, पोलीस हवालदार विजय दौंडकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू-मोशी रोडवरील बोराटेवस्ती, मोशी येथील महालक्ष्मी फर्निचर दुकानासमोर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आकाश कुमार भेराराम बिश्नोई (वय २१, रा. दुर्गापार्क, सस्तेवाडी, मोशी; मूळ राजस्थान) याच्याकडून ७१.७२ ग्रॅम एम.डी., तर प्रविण कुमार हिराराम बिश्नोई (रा. दुर्गापार्क, सस्तेवाडी, मोशी; मूळ राजस्थान) याच्याकडून १०८.७३ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले. दोघेही अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगत व वाहतूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), १७(ब), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन तसेच पोलीस अंमलदार विजय दौंडकर, निखिल शेटे, कपिलेश इगवे, संतोष सपकाळ, सुभाष गुरव आणि प्रतीक कवडे यांच्या पथकाने केली.

अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण कायम ठेवत अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अंमली पदार्थांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेशी संपर्क साधावा किंवा ७७९८१००११२ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनऊ जीव गेले, तरी प्रशासन गप्पच! मोशी दुर्घटनेतील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न?
Next Article खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

विद्युत डीपी चोरट्यांना बेड्या; १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?