Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून; आरोपी पतीला कर्नाटकातून २४ तासांत अटक
मनोरंजन

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून; आरोपी पतीला कर्नाटकातून २४ तासांत अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बावधन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; विजापूरच्या शेतातून आरोपी ताब्यात

पुणे बावधन: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून खून करून पसार झालेल्या आरोपी पतीला बावधन पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली. परशुराम भागप्पा हरिजन (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निलाबाई परशुराम हरिजन (वय ४२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडकर वस्ती, भुगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम हरिजन याने पत्नी निलाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यातून त्याने कोणत्यातरी धारदार शस्त्राने निलाबाई यांचा गळा चिरून त्यांचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खून केल्यानंतर आरोपी फरार झाल्याने त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपीने खुनासाठी वापरलेले धारदार शस्त्रही कोठेतरी लपविल्याचा संशय होता. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या हालचालींचा माग काढला.

त्यानंतर तपास पथकाच्या दोन स्वतंत्र टीम तयार करून त्यांना दोन राज्यांमध्ये रवाना करण्यात आले. तांत्रिक तपासातून आरोपी कर्नाटकातील विजापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक पोलीस व नागरिकांच्या मदतीने कारवाई करून परशुराम हरिजन याला ताब्यात घेतले.

या धडाकेबाज कारवाईमुळे खून केल्यानंतर राज्याबाहेर पसार झालेल्या आरोपीला २४ तासांच्या आत बेड्या ठोकण्यात बावधन पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) प्रदीप जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ विठ्ठल कुबडे तसेच हिंजवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई डंगारे, तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!
Next Article थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नऊ जीव गेले, तरी प्रशासन गप्पच! मोशी दुर्घटनेतील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न?

September 4, 2026

परभणीत ₹१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगारांची निर्मिती

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?