Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»तिरंग्याला मानवंदना देत देशाच्या अखंडता, एकता आणि सार्वभौमत्वासाठी योगदान देण्याचा मानवाधिकार संघटनेचा संकल्प
पुणे

तिरंग्याला मानवंदना देत देशाच्या अखंडता, एकता आणि सार्वभौमत्वासाठी योगदान देण्याचा मानवाधिकार संघटनेचा संकल्प

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आकुर्डीत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आकुर्डी, दि.१७ ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असतानाच वर्ल्ड ऑफ मदर, जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथील प्रांगणात ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार संरक्षण संघटना) यांच्या वतीने ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उपअभियंता शांताराम कोलब, ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी आणि उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा फडकताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला अभिवादन केले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सुरू होताच उपस्थित पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सन्मानपूर्वक उभे राहून राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद केसरकर यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या सामाजिक कार्याची माहिती देताना संघटनेच्या माध्यमातून नागरिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. उपअभियंता शांताराम कोलब यांनी, “समाजसेवा हीच राष्ट्रसेवा आहे. त्यासाठी प्रत्येकाने कायम सेवाव्रती राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन केले.

स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान, त्यांचा संघर्ष तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. देशाची अखंडता, एकता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आपापल्या परीने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक सचिव रामदास खोत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ रोकडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, ‘प्रभाकर न्युज’चे मुख्य संपादक, संघटनेचे सल्लागार श्रीधर जगताप,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन गाडे, पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी आशिष गायकवाड, सोलापूर शहर उपाध्यक्ष गणेश जाधव, सोलापूर शहर सल्लागार पिराजी नाईकवाडे, पिंपरी-चिंचवड जनसंपर्क अधिकारी तानाजी मेंगुलकर, देहूरोड शहर उपाध्यक्ष रफिक सय्यद, देहूरोड शहर सचिव जाकीर सय्यद, कमल राज नायर आणि अंबरीश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्याचा गौरव, तिरंग्याबद्दलचा आदर आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल सोरटे यांनी केले.

Post Views: 34
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा
Next Article परभणीत ₹१,६२२ कोटींची गुंतवणूक; १५,६१७ रोजगारांची निर्मिती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?