Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन
पुणे

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 7, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासह उद्योग क्षेत्रातील नव्या संधींचे प्रदर्शन; १७५ हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग

पुणे, दि.७ सप्टेंबर २०२६ : भारताच्या उत्पादन क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दिशा देणाऱ्या पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) २०२६ चे आज मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे दिमाखात उद्घाटन झाले. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, आधुनिक मशीन टूल्स आणि औद्योगिक उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे व्हाइस चेअरमन अरविंद गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी IMTMAच्या अध्यक्षा मोहिनी केळकर, उपाध्यक्ष विक्रम साळुंके तसेच महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिबक दासगुप्ता उपस्थित होते.

भारताने मशीन टूल उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची गरज

उद्घाटनप्रसंगी अरविंद गोयल यांनी भारतातील स्थानिक उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज अधोरेखित केली. भारतातील वेगाने विस्तारत असलेली उत्पादन परिसंस्था मशीन टूल उद्योगासाठी मोठ्या संधी निर्माण करीत आहे. मात्र, मशीन टूल्ससाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. देशात अधिक सक्षम आणि मजबूत उत्पादन व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जगातील किमान तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मशीन टूल उत्पादक होण्याचे लक्ष्य भारतीय उद्योगाने ठेवावे, असे आवाहन गोयल यांनी केले.

महाराष्ट्रातील औद्योगिक परिसंस्थेला प्रदर्शनाची मोठी संधी

IMTMAच्या अध्यक्षा मोहिनी केळकर यांनी पुण्यात प्रदर्शन आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात भारतातील सर्वात मजबूत मशीन टूल परिसंस्थांपैकी एक असून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये महत्त्वाचे औद्योगिक क्लस्टर्स विकसित झाले आहेत.

पुणे हे ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग उद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने उच्च अचूकतेच्या उत्पादन तंत्रज्ञानाची मागणी मोठी आहे. ही गरज पूर्ण करण्यामध्ये मशीन टूल उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात IMTMAची मजबूत उपस्थिती असून सुमारे १८० सदस्य आहेत. गेल्या दोन दशकांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून असोसिएशन उद्योग क्षेत्राला सातत्याने सहकार्य करत असल्याचे केळकर यांनी नमूद केले.

१८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित

IMTMAचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिबक दासगुप्ता यांनी सांगितले की, पुणे हे विविध उत्पादन उद्योगांचे मजबूत केंद्र असल्याने या परिसरातील उत्पादन क्षेत्राशी संबंधित समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी PMTX आणि FACTEQचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे एकूण क्षेत्रफळ तब्बल ११,००० चौरस मीटर असून १७५ हून अधिक प्रदर्शक, सुमारे ३०० ट्रेड डेलिगेशन आणि १८,००० हून अधिक अभ्यागत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक आवृत्तीसोबत प्रदर्शनाचा विस्तार होत असून मशीन टूल उत्पादक तसेच वापरकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले.

उद्योगांसाठी तंत्रज्ञान, नेटवर्किंग आणि व्यवसायाच्या नव्या संधी

PMTX 2026 आणि FACTEQ २०२६ च्या माध्यमातून उत्पादन उद्योगांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, औद्योगिक उपकरणे आणि नव्या व्यावसायिक संधी एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील उत्पादन क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या नव्या टप्प्यावर नेण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी : www.mtx.co.in | www.facteq.in

IMTMAची ८० वर्षांची उद्योगसे

इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) ची स्थापना १९४६ मध्ये झाली असून ती भारतातील मशीन टूल उद्योगाची प्रमुख औद्योगिक संघटना आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सुमारे ५८० कंपन्या IMTMAच्या सदस्य आहेत. मेटल कटिंग व मेटल फॉर्मिंग मशीन, सब-सिस्टम्स, अॅक्सेसरीज, कटिंग टूल्स आणि संबंधित उपकरणांच्या निर्मितीशी या कंपन्या जोडलेल्या आहेत.

धोरणात्मक वकिली, ज्ञानविषयक व्यासपीठे, संशोधन अहवाल, प्रदर्शने, परिसंवाद, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून भारताच्या मशीन टूल उद्योगाच्या विकासाला IMTMAकडून चालना दिली जाते.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोसरीच्या वस्तादाचा वाईच्या मातीत गौरव
Next Article महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल, मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास -केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026

सिनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी उत्तम कुटे तर उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी विजय सुराणा 

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?