Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»२०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!
पुणे

२०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 4, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

हिंजवडी मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पुणे महानगर प्रदेशात आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारणार

पुणे प्रतिनिधी: मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर-आउटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणार आहे. २०३० पर्यंत पुणे देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका-३ च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

हिंजवडी हा देशातील महत्त्वाचा आयटी हब असून, दररोज हजारो कर्मचारी या परिसरात कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा एक ते दोन तास रस्त्यावर अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. २०१८ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्यांच्याच हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पीपीपी तत्त्वावरील देशातील पहिला मेट्रो प्रकल्प

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो हा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) उभारण्यात आलेला देशातील पहिला मेट्रो प्रकल्प ठरला आहे. डीबीओटी तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी आणि राज्य सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला.

या मेट्रोच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, ही ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पुणे शहरात सुमारे १२० किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून, काही मार्गांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील १२ महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा तिचे काम सुरू आहे. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार आणि आर्थिक परिसंस्थेचे जाळे विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.

पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपार

पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पुणे आणि पीएमआर परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.

पुणे मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून विकसित होत असून, आवश्यक ऊर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर व आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांच्या जाळ्यामुळे पुणे आयटी आणि उत्पादन क्षेत्राबरोबरच फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुणे मेट्रोच्या टप्पा-२ मधील चार विस्तारित मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यांचे भूमिपूजन होत आहे. सुमारे ३१ किलोमीटर लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जाणार आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक होईल. आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे ‘कॉमन मॅन’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील.

देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो

पुणे मेट्रो मार्गिका-३ ही देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार आहे. सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत. सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागातून मेट्रोचे संचालन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यामध्ये मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेट्रो-३ हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या समस्या कमी करणारा प्रकल्प ठरेल. पुण्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या निर्मितीपासून मंजुरीपर्यंत अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. जुलै महिन्यात हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

देशात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच गरिबी निर्मूलन आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम मिळत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड करा! प्रत्येकी १५ हजार रुपये बोनस द्या; संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
Next Article वंचित, पारधी व भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांसोबत गुणवंत कामगार कल्याण मंडळाची दिवाळी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!

November 1, 2026

बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; सेवा बंद करा!

October 31, 2026

राजन नायर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती

October 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?