पुण्यात २४ ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन समुदायातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य समन्वयकपदी (स्टेट कोऑर्डिनेटर) राजन नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनिमित्त राजन नायर यांचा सत्कार समारंभ शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर २०२६) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
राजन नायर हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी ख्रिश्चन समुदायाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून राजन नायर यांना शुभेच्छा व प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता पुण्यातील वायएमसीए, क्वार्टर गेट येथे होणार आहे.
