Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड करा! प्रत्येकी १५ हजार रुपये बोनस द्या; संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड

आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड करा! प्रत्येकी १५ हजार रुपये बोनस द्या; संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
पिंपरी-चिंचवडमधील ८०० हून अधिक आशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी; दिवाळीपूर्वी रक्कम बँक खात्यात जमा करण्याची विनंती

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ८०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आशा स्वयंसेविकांच्या महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक योगदानाची दखल घेऊन प्रशासनाने दिवाळीपूर्वी हा निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माता व बाल आरोग्य, गरोदर महिलांची देखभाल, बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, क्षयरोग व डेंग्यू यांसारख्या आजारांबाबत जनजागृती, घरोघरी आरोग्य सर्वेक्षण तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी या स्वयंसेविका सातत्याने कार्यरत असतात.

अत्यल्प मानधनावर काम करत असतानाही त्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडतात. शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. विशेषतः माता, बालके, गरोदर महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यविषयक सुविधा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्या करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकांच्या कार्याची दखल घेऊन दिवाळीसारख्या आनंदाच्या सणानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनाही आनंद मिळावा, या सामाजिक भावनेतून महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक आशा स्वयंसेविकेला किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

तसेच, या अनुदानासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक तरतूद करून संबंधित प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी आणि दिवाळीपूर्वी ही रक्कम सर्व पात्र आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, अशी विनंतीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आशा स्वयंसेविका या शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टाची आणि सेवेची योग्य दखल घेऊन दिवाळीच्या निमित्ताने त्यांना आर्थिक सन्मान मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका संदीप वाघेरे यांनी मांडली आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआग विझविताना दोन अग्निशमन जवान जखमी; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Next Article २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?