Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»३५०० किमीचा खडतर काश्मीर-लडाख प्रवास; प्रणय बांदिवडेकर यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान
महाराष्ट्र

३५०० किमीचा खडतर काश्मीर-लडाख प्रवास; प्रणय बांदिवडेकर यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मानवाधिकार जनजागृतीसाठी साहसी मोटारसायकल मोहीम; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव

कणकवली प्रतिनिधी ,संतोष नाईक: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी मोटारसायकलवरून काश्मीर, लडाख आणि भारत-पाकिस्तान व भारत-चीन सीमावर्ती भागातील तब्बल ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेचा प्रचार व प्रसार केला. त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संघटनेच्या कोकण विभागाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई व पालघर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते प्रणय बांदिवडेकर यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

बांदिवडेकर यांनी आपल्या मोटारसायकल प्रवासातून साहस, सामाजिक बांधिलकी आणि संघटनेच्या कार्याचा प्रभावी संदेश दिला. संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी ते स्वखर्चाने पुढाकार घेत असून, मानवाधिकारांच्या जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ योगदानाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.

अमृतसरपासून चंदीगडपर्यंत रोमांचकारी प्रवास….

या साहसी मोहिमेला अमृतसर येथील सुवर्ण मंदिर व अटारी बॉर्डरपासून सुरुवात झाली. त्यानंतर श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, झोजिला पास, कार्गिल, झंस्कार खोरे असा प्रवास करत त्यांनी लडाखमध्ये प्रवेश केला.

कार्गिलहून नामिका ला, फोटू ला मार्गे लेह गाठल्यानंतर खारदुंग ला, नुब्रा व्हॅली, दिसकीत, हंडर सँड ड्यून्स, तुर्तुक आणि थांग या भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.यानंतर पँगाँग लेक, हानले, उमलिंग ला पास, डेमचोक, फोती ला, न्योमा व पुगा व्हॅली असा अत्यंत आव्हानात्मक प्रवास त्यांनी पूर्ण केला. जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्त्यांपैकी एक असलेल्या उमलिंग ला परिसरातील प्रवास हा त्यांच्या मोहिमेतील विशेष आकर्षण ठरला.परतीच्या प्रवासात त्यांनी मनाली-लेह महामार्गावरील लाचुंग ला, नकीला, बारालाचा ला, जिस्पा आणि मनाली मार्गे चंदीगड गाठत आपल्या ३५०० किलोमीटरच्या मोटारसायकल मोहिमेची यशस्वी सांगता केली.

गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव….

याच कार्यक्रमात संघटनेच्या वतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी २०२६ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातून प्रथम क्रमांक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण गटातून द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या कुमारी सानवी नारायण दळवी हिच्यासह विशेष प्राविण्य मिळवलेल्या कुमारी आर्या शांतिनाथ तेली व कुमार आराध्य अनिल मटकर यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी कणकवली तालुकाध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स, कणकवलीचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊसचे प्रोप्रायटर श्री. व सौ. महेंद्र चव्हाण, कणकवली तालुका सदस्य अक्षय शेडेकर, कीर्ती आंबेरकर, गडमठ गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोकण विभागातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवैजापूरच्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू द्या
Next Article कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरी केंद्रात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

September 7, 2026

चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात जमीन, वीज व पाणी उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही करावी – अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

September 7, 2026

गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 27, 2026

सोशल मीडियातून जुळल्या १,६५० हून अधिक विवाहगाठी; सुभाष ढवळेंची अनोखी समाजसेवा!

August 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?