Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात जमीन, वीज व पाणी उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही करावी – अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
महाराष्ट्र

चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात जमीन, वीज व पाणी उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही करावी – अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 7, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

येवला चिचोंडी औद्योगिक वसाहतीत सुखजीत स्टार्च कंपनीचा मका प्रक्रिया उद्योग उभारला जाणार

मुंबई, दि. ७ सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.

या प्रकल्पासाठी चिचोंडी औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.सुखजित स्टार्च लि. यांचा उद्योग लवकर सुरू होण्यासाठी उद्योग विभाग आणि संबंधित कंपनीने सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज १,२०० टन, तर दुसऱ्या टप्प्यात दररोज २,४०० टन मक्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दरवर्षी सुमारे ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्यावर प्रक्रिया होणार आहे. नाशिक जिल्ह्यात मका हे प्रमुख पीक असून, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील मका उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच मक्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणारा हा उद्योग शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होणार असल्याने येवला आणि परिसरातील सुमारे ५० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊन, मका पिकाला स्थानिक पातळीवरच मोठी मागणी निर्माण होईल. परिणामी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात १००० हून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर वाहतूक, साठवणूक, कृषी सेवा, देखभाल, लॉजिस्टिक्स आणि इतर पूरक व्यवसायांमधून अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील औद्योगिक विकासाला आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी प्रकल्पाच्या सुरळीत उभारणी व कार्यान्वयनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पासाठी स्वतंत्र फिडरद्वारे ६ मेगावॅट वीजपुरवठा तसेच नांदूर मधमेश्वर धरणातून दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे संबंधित विभागांना जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, पाणी, वीज तसेच अन्य पायाभूत सुविधांची पूर्तता वेळेत व्हावी यासाठी उद्योग, जलसंपदा, एमआयडीसी, महावितरण तसेच संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.या मेगा प्रोजेक्टसाठी पुरवल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ६० टक्के पाणी पुनर्प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मका पिकावर आधारित या मोठ्या मूल्यवर्धन उद्योगाला आवश्यक त्या अतिरिक्त सवलती व प्रोत्साहनांचा लाभ मिळावा यासाठी या प्रकल्पाचा ‘मेगा प्रोजेक्ट’मध्ये समावेश केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला आवश्यक असलेल्या विविध शासकीय सवलती आणि सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

“शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक पातळीवरच मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मका पिकाचे मूल्यवर्धन करणे आणि येवला तालुक्यात उद्योग व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा,”

……छगन भुजबळ. अन्न व नागरी पुरवठा मंत्री.(महा) 

या प्रकल्पामुळे येवला तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच ‘शेतमालापासून उद्योग आणि उद्योगातून रोजगार’ अशी विकासाची साखळी निर्माण होणार असून, येवला औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

बैठकीला आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अनबळगन, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उद्योग विभागाचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब यशवंते, उद्योग उपसचिव आबासाहेब कवळे, नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कल्पेश लहिवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.

त्याचप्रमाणे व्हिसीद्वारे माजी खासदार समीर भुजबळ, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र कुशवाह, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आदी उपस्थित होते.

 

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
Next Article महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

September 7, 2026

गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 27, 2026

सोशल मीडियातून जुळल्या १,६५० हून अधिक विवाहगाठी; सुभाष ढवळेंची अनोखी समाजसेवा!

August 22, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागेचा प्रस्ताव सादर करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

August 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?