Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात
महाराष्ट्र

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 21, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नाशिक : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या निमित्ताने नाशिकमध्ये असताना, विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुदैवाने, या अपघातात आमदार अमित गोरखे व त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी थोडक्यात बचावले असून, सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत.

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे, या अत्यंत महत्त्वाच्या आणि न्याय्य मागणीसाठी राज्यभरात आंदोलन, मोर्चे केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे एका भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चात वंचित व उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने आक्रमक भूमिका मांडणारे आमदार अमित गोरखे देखील सहभागी झाले होते. याच दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये हा अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील दौऱ्यादरम्यान आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या एका वाहनाशी अचानक धडक झाली.

या दुर्घटनेत आमदार अमित गोरखे यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली असून, तातडीने त्यांना वैद्यकीय मदत व प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यासोबत असलेले सर्व सहप्रवासी, चालक आणि सुरक्षा रक्षक देखील सुखरूप आहेत. घटनेची माहिती समजताच संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी खळबळ उडाली होती.

आमदार अमित गोरखे यांनी सातत्याने समाजहिताच्या आणि उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर शासनाकडे आणि जनतेसमोर आपली ठाम भूमिका मांडली आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकुत्रे पाळता? मग नियमही पाळा! विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी
Next Article गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट महागात! ९ मंडळांवर गुन्हे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026

महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?