Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’
महाराष्ट्र

उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक! 

कसारा … : काल रात्री मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला व महाविद्यालयीन तरुणी चिंतेत होत्या. अशा परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी येथे पोहोचली. एसटी चालक आणि वाहकाने दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आधार मिळाला. या कर्तव्यदक्षतेचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विशेष कौतुक केले.

रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने उंबरमाळी स्थानकावर चाकरमानी, विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी अडकले होते. ही बाब लक्षात येताच कसारा येथे थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आगारात बसस्थानक प्रमुख यांना माहिती दिली. तसेच अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बस पाठविण्याची विनंती केली. बसस्थानक प्रमुख श्रीमती पूनम देशमुख यांनीही यास दुजोरा दिल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी स्थानकाकडे रवाना करण्यात आली.

रात्रीच्या वेळी एसटी बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. बसमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरदार महिलांची संख्या लक्षणीय होती. सुरक्षित प्रवासाची सोय झाल्याचे समजताच त्यांनी आपल्या पालकांना दूरध्वनी करून एसटी बस मदतीला आल्याची माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांचीही चिंता दूर झाली. प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानले. त्यानंतर ही बस सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाली.

या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. ‘एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेणे, हीच एसटीची खरी ओळख आहे. किरण खांडवी आणि राकेश पत्की यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत
Next Article आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री अदिती तटकरे

November 19, 2026

विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपली!

October 29, 2026

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?