Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!
महाराष्ट्र

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेच्या हक्कासाठीचा लढा सुरूच ठेवण्याचा मारुती भापकर यांचा निर्धार

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : उजनी धरण क्षेत्रातील पारंपरिक मच्छीमारी व्यवसायावर ठेकेदारी पद्धतीचा निर्णय लागू करण्याच्या हालचालींना विरोध करत भोई, कोळी, आदिवासी, भिल्ल तसेच फासे पारधी समाजातील मच्छीमारांनी केलेल्या आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. संबंधित ठेकेदारी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली.

उजनी धरण क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या उपजीविकेवर या ठेकेदारी पद्धतीमुळे परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंचन भवन, पुणे यांच्या कार्यालयासमोर संबंधित समाजातील महिला, युवक आणि मच्छीमारांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

या आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला होता. शासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर पिंपरी-चिंचवड शहरातील जनचळवळी या आंदोलनात सहभागी होतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, आंदोलकांच्या मागणीची दखल घेत संबंधित ठेकेदारीला स्थगिती देण्यात आल्याचे लेखी पत्र प्रशासनाकडून मिळाल्यानंतर उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.

मात्र, ही स्थगिती म्हणजे लढ्याचा अंतिम विजय नसून पुढील काळात या निर्णयाबाबत पुन्हा हालचाली होण्याची शक्यता लक्षात घेऊन मच्छीमारांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे भापकर यांनी म्हटले आहे. भविष्यात ठेकेदारी पद्धतीने मच्छीमारीचा निर्णय पुन्हा घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही मार्गाने विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करण्याची भूमिका कायम राहील, असे सांगत भापकर यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व महिला, युवक आणि मच्छीमारांचे अभिनंदन केले.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleUPI व्यवहारांवरील MDR शुल्काचा निर्णय मागे घ्या; मारुती भापकर यांची मागणी
Next Article कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे कलाकृतीत रूपांतर; धावडे वस्तीतील जी.व्ही.पी. पॉईंटचे सुशोभीकरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026

महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालयाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?