Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरीत भक्तिरसाचा जल्लोष! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
पिंपरी चिंचवड

पिंपरीत भक्तिरसाचा जल्लोष! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पुष्पवृष्टीने पालखीचे स्वागत; नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था

पिंपरी प्रतिनिधी : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषाने संपूर्ण पिंपरी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

पिंपरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात नगरसेवक संदीप वाघेरे तसेच पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, वारकरी, भाविक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्यासह विविध भजनी मंडळे, धार्मिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांचे स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाच्या गजरामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाला भक्तीच्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था

पालखी सोहळ्यासोबत मार्गक्रमण करणाऱ्या हजारो वारकरी व भाविकांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दूरवरून आलेल्या वारकऱ्यांनी या सेवाकार्याचा लाभ घेतला. नागरिक आणि स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली.

‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा’

यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीत स्वागत करण्याचा हा क्षण प्रत्येक पिंपरीकरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून यापुढेही अशाच प्रकारे सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

पालखीच्या स्वागतासाठी परिसरात आकर्षक सजावट, स्वागत कमानी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली होती. भक्तिगीते तसेच विविध भजनी मंडळांच्या सादरीकरणामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. पालखी मार्गावर नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत विठ्ठलनामाचा जयघोष केला.

‘तुका म्हणे धावा विठ्ठलाच्या नामी’ या भक्तिभावाने पिंपरी दुमदुमून गेले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरीच्या भूमीत भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
Next Article कुदळे फौंडेशनच्या वतीने खडकीत अन्नदान; हजारो नागरिकांनी घेतला आस्वाद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?