Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
पिंपरी चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रदेश संघटकपदी अरुण (नाना)कांबळे; पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रोहित खर्गे, कार्याध्यक्षपदी दादाराव आढाव

पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ – उपमहापौर शर्मिला बाबर­

पिंपरी, दि. ७ ऑगस्ट : मराठी पत्रकार संघ, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा कार्यकारिणी तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व नियुक्तीपत्र प्रदान समारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पत्रकार कक्षात उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश संघटक अरुण कांबळे आणि पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक उत्तम केंदळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करून प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. प्रदेश संघटकपदी अरुण कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रोहित खर्गे, महिला पुणे जिल्हाध्यक्षपदी मनीषा थोरात पिसाळ, पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षपदी अर्चना मेंगडे, कार्याध्यक्षपदी दादाराव आढाव, उपाध्यक्षपदी गणेश मोरे, सचिवपदी बजरंग मासाळ, खजिनदारपदी संतोष जाधव, संपर्कप्रमुखपदी संदीप सोनार यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच नागेश खजूर्गीकर, बलभीम भोसले, उमेश सनस, सीताराम मोरे, उमेश यादव, संतलाल यादव, श्रीधर जगताप आणि अजय कुलकर्णी यांचीही कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, “शहरातील नागरिकांच्या भावना, समस्या आणि अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार बांधव करीत असतात. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”

शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत पत्रकारांनी सकारात्मक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडावेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय देण्याबरोबरच शहरातील विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडून प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे आवाहनही बाबर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले, तर आभार रोहित खर्गे यांनी मानले.कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, विविध माध्यमांचे पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 17
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसांगवी विभागाच्या नव्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन
Next Article पिंपरीत भक्तिरसाचा जल्लोष! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?