Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!
पिंपरी चिंचवड

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 21, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पवना,भामा आसखेड आणि ड्रेनेज प्रकल्पांवरून प्रशासनाला धारेवर; १५ दिवसांत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची सचिन चिखले यांची मागणी

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी ७०० कोटी रुपये आणि ड्रेनेज मास्टर प्लॅनसाठी ५४६.५० कोटी रुपये असे एकूण १ हजार २४६ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला असून, आधीच्या प्रकल्पांचा खर्च, त्यांची सद्यस्थिती आणि अपेक्षित परिणाम यांचा हिशेब जनतेसमोर मांडल्याशिवाय नव्याने कर्ज घेऊ नये, अशी ठाम भूमिका मनसेचे शहराध्यक्ष व गटनेते सचिन तुकाराम चिखले यांनी घेतली आहे.

‘पाणी योजनेला विरोध नाही, तर पैशाच्या अपव्ययाला विरोध आहे,’ अशी स्पष्ट भूमिका मांडत चिखले यांनी महापालिका प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पिंपरी-चिंचवडकरांना दररोज मुबलक पाणी मिळालेच पाहिजे. पवना आणि भामा आसखेडमधून शहराला पाणी मिळावे, यासाठी मनसे नेहमीच आग्रही राहिली आहे. मात्र, जनतेच्या करातून जमा झालेला पैसा खर्च करूनही नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसेल, तर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जुन्या कर्जाचा बोजा असताना नव्या कर्जाची घाई कशासाठी ?

महापालिकेवर यापूर्वीच ३६४.५१ कोटी रुपयांचे कर्ज बाकी असल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यातच ठेकेदारांची तब्बल ४ हजार ४९३ कोटी रुपयांची देणी आणि लवादासंदर्भातील ५२७ कोटी रुपयांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगत, अशा आर्थिक परिस्थितीत आणखी १,२४६.५० कोटींचे कर्ज घेणे म्हणजे भविष्यातील आर्थिक संकटाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे चिखले यांनी म्हटले आहे.

पुलांच्या कर्जाचा अनुभव विसरलात का?

नाशिक फाटा डबल डेकर पुलासाठी १५९.९१ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्यापैकी ९१.९० कोटी रुपये परतफेड करूनही अद्याप ६८.०१ कोटी रुपये बाकी आहेत. मदर तेरेसा आणि एम्पायर इस्टेट पुलाच्या कामासाठीही ९९.४२ कोटी रुपये खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. विकासकामे पूर्ण झाली, मात्र त्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड अनेक वर्षे करावी लागत आहे. हाच आर्थिक बोजा आता पवना आणि ड्रेनेज प्रकल्पांच्या माध्यमातून पुन्हा नागरिकांवर टाकला जाण्याची भीती मनसेने व्यक्त केली आहे.

पवना जलवाहिनीवर कोट्यवधी खर्च, तरी पाण्याचा थेंबही वाढला नाही!

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी यापूर्वीही निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्यात आले होते. मात्र, मावळ परिसरातील स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काम रखडले. टाकण्यात आलेले पाइप तसेच पडून राहिल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेल्याचा आरोप मनसेने केला आहे. यापूर्वी सुमारे २०० कोटी रुपये खर्च करूनही शहराला एक थेंबही वाढीव पाणी मिळाले नसल्याचा दावा चिखले यांनी केला.

सुमारे ४०० कोटींचा असलेला प्रकल्प आता १ हजार ४०० ते १ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगत, मावळातील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुन्हा काम सुरू करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच JNNURM खात्यातील ५१६.३१ कोटी रुपयांचा निधी प्रथम पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्याची मागणीही करण्यात आली आहे.

भामा आसखेड योजनेवरही प्रश्नचिन्ह

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेवर २५० ते ३०० कोटी रुपये खर्च होऊनही अद्याप शहराला अपेक्षित पाणी मिळाले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. १६२ कोटी रुपयांचे कंत्राट देऊन पाच वर्षांत केवळ ७० टक्के काम पूर्ण झाले असेल, तर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करणार कोण, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

ड्रेनेजवर कोट्यवधींचा खर्च, तरीही सांडपाणी नद्यांत!

ड्रेनेज आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांवर ८८० कोटी रुपयांहून अधिक खर्च अथवा मंजुरी असूनही शहरातील ड्रेनेज व्यवस्था तुंबण्याचे प्रकार सुरूच आहेत. नद्यांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने या योजनांच्या प्रत्यक्ष परिणामांचा लेखाजोखा जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे. ड्रेनेज विभागाच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता नव्याने कर्ज घेतल्यास भविष्यात नागरिकांवर पाणीपट्टीवाढीचा बोजा पडू शकतो, असा इशाराही मनसेने दिला आहे.

मोशी रुग्णालयाच्या PPP करारावरही खुलासा करा!

मोशी येथील रुग्णालयाच्या बांधकामावर सुमारे १७० कोटी रुपये खर्च होऊन ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असताना, उर्वरित काम सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर देण्याची गरज काय, असा सवाल सचिन चिखले यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत झालेला खर्च, कराराच्या अटी आणि पुढील आर्थिक व्यवहार यांचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मनसेच्या सहा प्रमुख मागण्या……

💮पवना आणि ड्रेनेजसाठी प्रस्तावित १,२४६.५० कोटी रुपयांचा कर्ज प्रस्ताव तात्काळ रद्द करावा.

💮पवना, भामा आसखेड आणि ड्रेनेज प्रकल्पांची संपूर्ण आर्थिक व कामकाजविषयक श्वेतपत्रिका १५ दिवसांत प्रसिद्ध करावी.

💮JNNURM खात्यातील ५१६.३१ कोटी रुपये प्रथम पाणीपुरवठा योजनेसाठी वापरावेत.

💮पवना प्रकल्पाबाबत मावळातील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचा विरोध दूर करून त्यांना विश्वासात घ्यावे.

💮मोशी रुग्णालयावरील खर्च आणि PPP कराराचा संपूर्ण तपशील जनतेसमोर मांडावा.

💮कोणतेही नवीन कर्ज घेण्यापूर्वी सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांचे मत विचारात घ्यावे.

‘आम्हाला पाणी हवे आहे, पण कर्जाचा बोजा नको; आम्हाला विकास हवा आहे, पण भ्रष्टाचार आणि पैशाचा अपव्यय नको!’ असा ठाम इशारा देत, महापालिका प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा सचिन तुकाराम चिखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे
Next Article पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ कलावंत सुहास दामोदर जोशी यांचा मानपत्र देऊन गौरव

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?