Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण

मुंबई दिं.०३ ऑक्टोबर.….ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन समजून घेण्याचे ज्ञान देते. काळाचा संदर्भ बदलला, तरी हे ज्ञान आणि त्यातून आलेली संस्कृती टिकून राहते. ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक आहे असे प्रतिपादन प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीतील किमान एक तरी ओवी अनुभवावी, असे आवाहन ही त्यांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत आणि मेराक इव्हेंट्स आयोजित ‘ज्ञानरंग : माऊलींच्या ओव्यांचा उत्सव’ हा सोहळा शुक्रवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात उत्साहात पार पडला. यावेळी मोहन जी बोलत होते.मोहन जी यांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ या विशेष मोबाइल ॲपचे याप्रसंगी लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मोहन जी म्हणाले की, जगाचे जीवन शाश्वत आहे आणि जगाकडे कसे पाहावे, जीवन कसे समजून घ्यावे, हे ज्ञान आपल्याला शिकवते. हे ज्ञान सर्वत्र एकच आहे. प्रत्येक कालखंडात महापुरुषांनी या ज्ञानाची आपल्या काळाच्या संदर्भात मांडणी केली. काळ बदलला, परिस्थिती बदलली, तरी ज्ञानाचे मूळ स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली संस्कृती टिकून राहिली आहे.

परकीय आक्रमणांच्या काळात भागवत भक्तीच्या आधारावर भारतीय समाज टिकून राहिला आणि वृद्धिंगत झाला. असे सांगून मोहन जी म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हे ज्ञान पोहोचले पाहिजे. आज जगाला मार्ग दाखवण्याची जबाबदारी भारताची आहे. ज्ञानेश्वरी हा भारताच्या ज्ञानपरंपरेतील अमूल्य ठेवा असून त्याला नव्या पिढीपर्यंत आणि जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे असे ही त्यांनी नमूद केले.

आजच्या आधुनिक माध्यमांचा उपयोग करून हा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या भावनेतून ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲप साकारण्यात आले आहे. भक्ती, ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला गेला आहे.या ॲपच्या माध्यमातून माऊलींच्या ओव्या रोजच्या जीवनात ऐकता, वाचता आणि समजून घेता येणार आहेत. ओवी ऐकतानाच तिचे शब्दागणिक वाचन करता येणार आहे.

हे ॲप आजपासून Google Play Store आणि Apple App Store वर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. या ॲपची संकल्पना व्हॅल्युएबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांची आहे.

‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ मालिकेचा शुभारंभ

याच सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांसह ‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ ही मालिका YouTube वर प्रसारित करण्यात आली. आजच्या धावपळीच्या जीवनात ज्यांना ज्ञानेश्वरीचे वाचन करणे शक्य होत नाही, त्यांना ती सहजपणे ऐकता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाची संकल्पना तसेच ज्ञानेश्वरीचे वाचन रेणुका देशकर यांनी केले असून श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन श्रीनिवास वर्णेकर यांनी केले आहे.

‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपच्या अधिकृत लोकार्पण सोहळ्यापूर्वी माऊली ज्ञानेश्वरांच्या अलौकिक रचनांवर आधारित मंत्रमुग्ध करणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि केतकी चैतन्य यांनी संत ज्ञानेश्वरांच्या विविध ओव्या आणि संगीत रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी माऊलींच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण निरूपण केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयेरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

राष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग

October 2, 2026

इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

September 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?