मुंबई प्रतिनिधी,अरविंद बनसोडे…..: महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त (शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६) विनम्र अभिवादन केले.
मुंबईतील हुतात्मा स्मारक चौक येथील स्मृतिस्थळावर महापौर रितू तावडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांनी दिलेले बलिदान आणि त्यांचा त्याग महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.
