Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»एसआरएतील कथित गैरव्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
मुंबई

एसआरएतील कथित गैरव्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 21, 2026Updated:November 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

खोटे दस्तऐवज, बनावट बिले आणि ठेकेदारांशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी

मुंबई प्रतिनिधी | अरविंद बनसोडे कुरनूरकर : बृहन्मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरए (SRA) मधील कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण आता चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांच्या कथित गैरव्यवहारांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून पुरावे गोळा करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा भगतसिंग युथ फाउंडेशन इंडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते गणेश रणु ननावरे यांनी केला आहे.

ननावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित भ्रष्टाचारातून जमवलेली संपत्ती, सार्वजनिक पैशांचा गैरवापर, खोटे दस्तऐवज, बनावट कामे, खोटी बिले तसेच ठेकेदारांशी असलेले कथित व्यावसायिक संबंध यासंदर्भातील पुरावे संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आले आहेत.

या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय अन्य काही अधिकाऱ्यांनाही वकिलांमार्फत नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विभागीय आयुक्त यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे ननावरे यांनी स्पष्ट केले. तसेच एसआरएचे मुख्य आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनाही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांत या कथित गैरव्यवहारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी सुरू असून, वरिष्ठ अधिवक्त्यांची टीम कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणीही पुढे येण्याची शक्यता आहे.

एसआरए प्राधिकरणातील कथित गैरव्यवहारांचे पुरावे न्यायालयात सादर झाल्यास या प्रकरणाला मोठे वळण मिळू शकते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांवरील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन त्यातून सत्य समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कारभाराकडे आता मुंबईकरांसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी
Next Article संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना महापौर रितू तावडे यांचे अभिवादन!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे

November 21, 2026

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना महापौर रितू तावडे यांचे अभिवादन!

November 21, 2026

महाराष्ट्रातील ३८ परिवर्तनवादी कवींच्या लेखणीचा ऐतिहासिक संगम!

November 11, 2026

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?