Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»महाराष्ट्रातील ३८ परिवर्तनवादी कवींच्या लेखणीचा ऐतिहासिक संगम!
मुंबई

महाराष्ट्रातील ३८ परिवर्तनवादी कवींच्या लेखणीचा ऐतिहासिक संगम!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘शब्दांची चळवळ’ काव्यसंग्रहाचे आंबेडकर भवनमध्ये दिमाखात लोकार्पण

भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन; संदेशदादा कर्डक यांच्या पुढाकारातून आंबेडकरी साहित्यिकांना मिळाले एक नवे व्यासपीठ

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील आंबेडकरी विचारांचे कवी, साहित्यिक आणि परिवर्तनवादी लेखणीला एकत्र आणणाऱ्या ‘शब्दांची चळवळ’ या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे ऐतिहासिक आंबेडकर भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्रातील तब्बल ३८ कवींच्या कवितांचा समावेश असलेला हा संग्रह आंबेडकरी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

संदेशदादा कर्डक यांच्या संकल्पनेतून साकारली ‘शब्दांची चळवळ’!

‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या परिवर्तनवादी कवींच्या प्रतिभेला एकत्र आणून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याची संकल्पना मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक (संदेशदादा कर्डक) यांनी प्रत्यक्षात साकारली.

या काव्यसंग्रहात राज्यातील विविध जिल्ह्यांतील ३८ कवींच्या वैचारिक आणि सामाजिक आशय असलेल्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे नेण्याबरोबरच नव्या आणि प्रस्थापित कवींना एकत्र आणण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

३८ कवींच्या लेखणीतून परिवर्तनाचा जागर!

या काव्यसंग्रहात संदेश कर्डक, राजरत्न कांबळे, जयेश सोळंकी, दिप्ती जाधव, सुरेखा ढोले, स्वाती चव्हाण, समाधान मस्के, सुरेश बनसोडे, सुमेध चन्ने, प्रेमदास खिल्लारे, सुनंदा साबळे, विराज निकम, संतोष रायते, अजय इंगळे, अशोक गवळी, हरीशचंद्र अलोणे, पुष्पा कांबळे, संतोष यशवंते, श्रेयस यादव, एस. पी. धनेश्वर, भाविन सैंदाणे, रामदास जाधव, विजय मनवर, विजय मोकळे, विनया तुरबे, डॉ. शुभा लोंढे, विशाल घोडके, शुभांगी गुरचळ, वैशाली देठे, सुवर्णा बनसोडे, ज्ञानदेव जाधव, सविता केदारे, तेजस यादव, कुमुदिनी निकम, दिलीप थोरात, सचिन कांबळे, प्रा. डॉ. विठ्ठल स. जाधव आणि रीता रामटेके या कवींच्या कवितांचा समावेश आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा

या सोहळ्याला प्रख्यात शाहीर संदेश उमप आणि ज्येष्ठ आंबेडकरी कवी बबनदादा सरवदे यांची विशेष उपस्थिती लाभली. काव्यसंग्रहाचे प्रकाशक आयु. अंकुश सोनवणे यांच्या माध्यमातून भीमराव आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बौद्धाचार्य मंगेश अडसूळे यांनी केले.

यावेळी मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी या चळवळीची भूमिका, आजवरची वाटचाल आणि काव्यसंग्रह निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. भीमराव आंबेडकर यांनी संग्रहातील सर्व कवींचे अभिनंदन करत ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच या वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

केवळ काव्यसंग्रह नव्हे, तर परिवर्तनाचा वैचारिक दस्तऐवज!

‘शब्दांची चळवळ’ हा केवळ कवितांचा संग्रह नसून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. लेखणीच्या माध्यमातून अन्याय, विषमता आणि सामाजिक विषमतेविरोधात आवाज बुलंद करण्याची ताकद या साहित्यामध्ये आहे.

महाराष्ट्रातील ३८ परिवर्तनवादी कवींना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम आंबेडकरी साहित्यविश्वात नवा अध्याय निर्माण करणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ऐतिहासिक आंबेडकर भवनमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते झालेल्या या लोकार्पणामुळे सहभागी कवी आणि साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

संदेशदादा कर्डक यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही शब्दांची चळवळ आता पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, परिवर्तनवादी विचारांचा जागर अधिक व्यापक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Post Views: 41
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडीतील चिकन चौकात किरकोळ वादातून दोन भावांवर हल्ला; लाकडी दांडका आणि स्टीलच्या कड्याने मारहाण
Next Article कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे

November 21, 2026

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना महापौर रितू तावडे यांचे अभिवादन!

November 21, 2026

एसआरएतील कथित गैरव्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी

November 21, 2026

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?