Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

October 3, 2026

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरील घटना; सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध

पिंपरी : रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ११ हजार ४७० रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे.

अजय चिंतामन देसलेपाटील (वय २९) हे २८ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरून जात असताना एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोर एका रिक्षाचालकाने त्यांना थांबविले. रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून देसलेपाटील यांच्या पॅन्ट व शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपयांची रोकड कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटली.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींबाबत कोणताही ठोस सुगावा नसताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून संबंधित रिक्षाचा क्रमांक मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख हा निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणात सुमारे १५ दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी शेखर माने याच्यावरही जबरी चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर, प्रविण बांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे आणि राजकुमार हणमंते यांच्या पथकाने ही कारवाई केली. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करीत आहेत.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

October 2, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 3, 20260

निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरील घटना; सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध पिंपरी : रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला…

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?