Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»एटीएममध्ये मदतीचा बहाणा अन् कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाला ३.६२ लाखांचा गंडा!
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

एटीएममध्ये मदतीचा बहाणा अन् कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाला ३.६२ लाखांचा गंडा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एटीएममधून एक लाखांची रोकड काढली; तर २ लाख ६२ हजारांचे सोने खरेदी

भोसरी प्रतिनिधी : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची एका अनोळखी भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल ३ लाख ६२ हजार २९८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली आहे.

याप्रकरणी रविंद्र पंडितराव कुलकर्णी (वय ७१, रा. महाराष्ट्र कॉलनी, सेक्टर क्रमांक १, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी इंद्रायणीनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डचा पासवर्ड जाणून घेतला. त्यानंतर हातचलाखीने फिर्यादींचे मूळ एटीएम कार्ड काढून घेत त्यांना दुसरे बंद असलेले एटीएम कार्ड दिले.

या कार्डच्या अदलाबदलीनंतर आरोपीने फिर्यादींच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे एक लाख रुपये काढले. तसेच तब्बल २ लाख ६२ हजार २९८ रुपयांचे सोने खरेदी केले. अशा प्रकारे फिर्यादींची एकूण ३ लाख ६२ हजार २९८ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लबडे करीत आहेत.

 

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी परिसरात दोन गुन्हे; एकाला दगडाने मारहाण, तर दुसऱ्याची म्हाडा अर्जाच्या नावाखाली १.४४ लाखांची फसवणूक
Next Article नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

मोशी परिसरात दोन गुन्हे; एकाला दगडाने मारहाण, तर दुसऱ्याची म्हाडा अर्जाच्या नावाखाली १.४४ लाखांची फसवणूक

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?