Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोशी परिसरात दोन गुन्हे; एकाला दगडाने मारहाण, तर दुसऱ्याची म्हाडा अर्जाच्या नावाखाली १.४४ लाखांची फसवणूक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोशी परिसरात दोन गुन्हे; एकाला दगडाने मारहाण, तर दुसऱ्याची म्हाडा अर्जाच्या नावाखाली १.४४ लाखांची फसवणूक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लुडो खेळण्यास न घेतल्याच्या रागातून तरुणाला दगडाने मारहाण; म्हाडाच्या बनावट पावत्या व प्रमाणपत्रे देऊन आर्थिक फसवणूक

पिंपरी-चिंचवड : मोशी परिसरात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत लुडो खेळण्यास न घेतल्याच्या रागातून एका तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत म्हाडाच्या घरकुल योजनेचा अर्ज भरण्याच्या नावाखाली १ लाख ४४ हजार १५४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लुडो खेळण्यास न घेतल्याने तरुणाला दगडाने मारहाण

मोशीतील शिवाजीवाडी येथे २० नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. तुकाराम गंगाराम शिंदे (वय २७) याने लुडो खेळण्यासाठी न घेतल्याचा राग मनात धरून अनिल प्रल्हादराव देशमुख (वय २८, रा. गायकवाड वस्ती, मोशी) याने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर डोक्यावर, कंबरेवर आणि डाव्या पायाच्या पोटरीवर दगडाने मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी वर्षा पांडुरंग वानखेडे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

म्हाडाच्या अर्जाच्या नावाखाली १.४४ लाखांची फसवणूक

दुसऱ्या घटनेत म्हाडाच्या घरकुल योजनेचा अर्ज भरण्यासाठी घेतलेले १ लाख ४४ हजार १५४ रुपये वैयक्तिक फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मोशी प्राधिकरणातील रोशनी रेसिडेन्सी येथे राहणारे व्यंकट मारोती राठोड (वय ५३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नितीन शहाजी वाघमारे (वय अंदाजे ३५, रा. जिजामाता कॉम्प्लेक्स, गणेशनगर, रावेत) याने म्हाडाचे अर्ज भरून देण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून पैसे घेतले. मात्र, अर्ज भरल्याची बनावट पावती दिल्याचा आरोप आहे.

तसेच फिर्यादी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी पूजा यांच्या अर्जासाठी आवश्यक असलेले डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखलेही बनावट दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे करीत आहेत.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!
Next Article एटीएममध्ये मदतीचा बहाणा अन् कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाला ३.६२ लाखांचा गंडा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

एटीएममध्ये मदतीचा बहाणा अन् कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाला ३.६२ लाखांचा गंडा!

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?