Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दोन दशकांच्या समाजिक कार्याचा पक्षश्रेष्ठींकडून सन्मान,संघटन बळकटीसाठी काम करण्याचा व्यक्त केला निर्धार,आमदार महेश लांडगे यांच्या निष्ठावंताला संघटनेत संधी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी…..भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रसिद्धीप्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलेल्या पटनी यांच्यावर पक्षाने आता सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे.

पटनी हे गेल्या २० वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सक्रिय सहभागी आहेत. पक्षाचे कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम आणि भाजपा परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. शहरातील राजस्थानी, मारवाडी आणि हिंदीभाषिक समाजातील विविध घटकांशी त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व ४८३ बूथवर सलग चार महिने शंभर टक्के यशस्वी आयोजन करण्यासाठी पटनी यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी समन्वय साधून कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी योगदान दिले.

पटनी यांच्या नियुक्तीबद्दल आमदार महेश लांडगे यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दोन दशकांतील त्यांची साथ, नि:स्वार्थ पक्षकार्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय संबंध मोलाचे आहेत. त्यांच्या निष्ठेला आणि समर्पित कार्याला पक्षश्रेष्ठींनी योग्य न्याय दिल्याची भावना लांडगे यांनी व्यक्त केली. पटनी यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा शहरातील पक्षसंघटनाला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर पटनी यांनी पक्षनेतृत्व, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकासजी डोळस, मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे, नगरसेवक उदय गायकवाड, नगरसेवक सागर गवळी आणि सहकारी उपस्थित होते पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षसंघटन बळकट करणे, समाजातील विविध घटकांशी संवाद वाढवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणे याला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपाच्या सरचिटणीसपदी माझी नियुक्ती करून पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. आमदार महेशदादा लांडगे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ माझ्यासाठी मोलाचे आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्नजी काटे, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी निष्ठेने पार पाडेन. पक्षसंघटन अधिक बळकट करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करणे याला माझे प्राधान्य राहील. माझ्यावर दाखवलेला विश्वास समर्पित कार्यातून सार्थ ठरवेन.”

— संजय पटनी, सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपा.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!
Next Article खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026

माथाडी कामगारांच्या हक्कासाठी भाजप मैदानात; ५० हजार सभासद नोंदणीचे लक्ष्य!

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?