Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
मुंबई

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई दिं.०२ ऑक्टोबर….सायबर सुरक्षेबाबत माहिती देताना माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करणारे सायबर धोके वेगाने बदलत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी केवळ तांत्रिक संरक्षण पुरेसे नसून प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’सारख्या मोहिमांमधून डिजिटल धोक्यांचे स्वरूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जात असून नागरिकांना व्यवहार्य सुरक्षाविषयक सवयी अंगीकारण्यासाठी सक्षम केले जात आहे.

सुरक्षित डिजिटल परिसंस्थेसाठी सर्व संबंधित घटकांमध्ये भक्कम समन्वय आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने माहितीपूर्ण, सावध आणि सायबरदृष्ट्या सजग राहिल्यास अधिक सुरक्षित व सक्षम डिजिटल भारताच्या उभारणीत योगदान देता येईल, असे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

ऑक्टोबर हा महिना जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बीएसईच्या पारंपरिक घंटानादाच्या धर्तीवर ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हा प्रतीकात्मक उपक्रम राबविण्यात आला. सुरक्षित सायबर अवकाशासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राची सामूहिक बांधिलकी यातून व्यक्त करण्यात आली. यावेळी मोहिमेच्या ‘सायबर अँथम’चेही अनावरण करण्यात आले.

या मोहिमेला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C), केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच बीएसईसह विविध उद्योग भागीदारांचे सहकार्य लाभले.

भारतीय पारंपरिक कठपुतळी कथाकथन कलेचा डिजिटल युगासाठी वापर करून सायबर सुरक्षेचे संदेश सहज समजतील, लक्षात राहतील आणि नागरिकांना इतरांपर्यंत पोहोचविता येतील, अशी मोहिमेची रचना आहे. या माध्यमातून मोबाइल ॲप, ई-मेल, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षित सवयींबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एपीकेद्वारे होणारी फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग, रिअल टाइम डीपफेक, ‘डिजिटल अटक’, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक आणि अन्य उदयोन्मुख धोक्यांची माहितीही दिली जाणार आहे.

स्क्रीनसेव्हर्स मंच, पोस्टर चौपाल, माहितीचित्रे, सायबर कथा, स्टिकर्स आणि ‘सायबर पाठशाला की किताब’ अशा सहज प्रसारित करता येणाऱ्या माध्यमांतून जनजागृती साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे साहित्य https://www.dsci.in/cyber-security-awareness-month-2026/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

डीएससीआयचे संचालक सुकृत घोष यांनी प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, बीएसई, सेबी, इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यासह या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या १७ औद्योगिक भागीदार संस्थांतील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
Next Article येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

राष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग

October 2, 2026

इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

September 23, 2026

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुधवार,…

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

राष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?