Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ;बीएसईमध्ये ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ उपक्रम;ऑक्टोबर महिन्यात सायबर सुरक्षेबाबत जागृती

मुंबई, दि. २ ऑक्टोबर : शहरे, लहान गावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना त्यांना सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन प्रकारांचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची असून, भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती हीच प्रभावी ‘फायरवॉल’ ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) सायबर सुरक्षा जनजागृती महिना २०२६ अंतर्गत देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) झाला. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांना दैनंदिन सायबर सुरक्षेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने होणारी फसवणूक आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यात येणार आहे.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, निवृत्तिवेतनधारक, गुंतवणूकदार, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल उपकरणे वापरणाऱ्या माता तसेच ई-स्पोर्ट्स खेळाडू अशा प्रत्येक घटकाने ऑनलाइन सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत सोपे आणि व्यवहार्य सुरक्षाविषयक संदेश पोहोचविणारी ही बहुघटक मोहीम कुटुंबे, व्यवसाय आणि समुदायांच्या सायबर सुरक्षेला बळकटी देईल. ‘कठपुतळी’ ही संकल्पना सायबर संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडते. ही मोहीम देशातील सर्वांत व्यापक सायबर जनजागृती मोहिमांपैकी एक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सायबर क्षेत्रातील सामूहिक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासन उद्योग क्षेत्रासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून नागरिकांचा सजग सहभागही तितकाच आवश्यक आहे, असे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग
Next Article बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

राष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग

October 2, 2026

इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

September 23, 2026

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुधवार,…

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

राष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?