Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निगडीत दामिनी पथकाची गस्त वाढविण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निगडीत दामिनी पथकाची गस्त वाढविण्याची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निगडी | प्रतिनिधी…… पिंपरी चिंचवड शहरातील निगडी गावठाण परिसरातील मारुती मंदिर ते यमुनानगर येथील बोल्हाई माता मंदिर या मार्गावर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर काही वाहनचालकांकडून विद्यार्थिनींची छेडछाड, मोठ्याने हॉर्न वाजवून दहशत निर्माण करणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे तसेच विद्यार्थिनींच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यासारखे प्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर काळभोर यांनी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन साद केले. संबंधित परिसरात शालेय वेळेत दामिनी पथकाची नियमित गस्त वाढविण्यासह आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रसन्नपुरम बिल्डिंग कॉर्नर ते यमुनानगर कॉर्नर या मार्गावरून माता अमृतानंदी शाळा, मॉडर्न शाळा आणि एस.पी.एम. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. याच मार्गावर काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे, विद्यार्थिनींना घाबरवणे आणि त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारांमुळे विद्यार्थिनी तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत दामिनी पथकाची नियमित गस्त, पोलिसांची उपस्थिती आणि संशयित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख वाढवून रोड रोमिओ तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सचिन काळभोर यांनी केली आहे.

‘विद्यार्थिनींची सुरक्षितता ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. तक्रारींची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे,’ असे काळभोर यांनी सांगितले.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next Article अहिल्यानगरची सुपुत्री कु.साक्षी बनसोडे हिचा बीड येथे सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?