Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 30, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

५ वाहनचोरीचे गुन्हे उघड; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ गुन्हे दाखल असलेला आरोपी जाळ्यात

पुणे (चिखली), प्रतिनिधी : चिखली पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने वाहनचोरीच्या घटनांचा छडा लावत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींच्या चौकशीतून तब्बल ५ वाहनचोरीचे आणि २ घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली असून, पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सुमारे २ लाख ९५ हजार रुपये किमतीची चार मोटारसायकली आणि एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व त्यांच्या पथकाने वाहनचोरांचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली. त्यातून पोलीस रेकॉर्डवरील वाहनचोर राज ऊर्फ ढेडेकऱ्या राज संतोष बापर्डेकर (वय २३, रा. शिवपार्वती हौसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली) हा साथीदारांच्या मदतीने वाहनचोरी करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

दरम्यान, पोलीस हवालदार प्रविण भोमाळे आणि विनोद व्होनमाने यांना बातमीदारामार्फत आरोपी राज बापर्डेकर याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राज संतोष बापर्डेकर आणि शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) यांना शिताफीने ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात चिखली पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. क्रमांक ४९०/२०२६, ४९८/२०२६, ४७२/२०२६, ४७४/२०२६ आणि ३२२/२०२६ हे पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले.

या कारवाईत पोलिसांनी बुलेट (एमएच ४३ बीटी ०८१४), स्प्लेंडर (एमएच १४ झेडब्ल्यू १०५४), होंडा शाईन (एमएच १४ एलके ८८६३), ऑटो रिक्षा (एमएच १४ एचएम १०३२) आणि सुझुकी ॲक्सेस (एमएच १४ जीएक्स २०७६) अशी पाच वाहने हस्तगत केली.

अटक आरोपी राज संतोष बापर्डेकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत वाहनचोर असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी वाहनचोरीचे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी शंकरसिंग टाक हा देखील सराईत गुन्हेगार असून, तो हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे चिखली परिसरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स.पो.नि सुभाष चव्हाण, पोहवा किरण काटकर, विनोद व्होनमाने, प्रविण भोमाळे, सुरज सुतार, अरुण साबळे, भरत माने, संतोष भालेराव, अजय गायकवाड, कंठय्या स्वामी, रोहित मोरे, पोलीस शिपाई अनिल राक्षे आणि संतोष भोर यांनी सहभाग घेतला.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या पर्यटनाला मिळणार नवी ओळख; ‘अप्पु घर’ होणार हायटेक : – अभिषेक बारणे
Next Article विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निगडीत दामिनी पथकाची गस्त वाढविण्याची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?