Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शहराच्या पर्यटनाला मिळणार नवी ओळख; ‘अप्पु घर’ होणार हायटेक : – अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

शहराच्या पर्यटनाला मिळणार नवी ओळख; ‘अप्पु घर’ होणार हायटेक : – अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड:……गेली ३५ वर्षे पिंपरी-चिंचवडकरांच्या बालगोपाळांच्या आणि शहरवासीयांच्या आठवणींचा कणा राहिलेले आणि शहराच्या पर्यटन ओळखीचे केंद्र असलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ (Appu Ghar) अम्युझमेंट पार्क आता नव्या आणि अत्याधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे. तब्बल १८ कोटी ६० लाखांच्या खासगी गुंतवणुकीतून या पार्कचे संपूर्ण कायापालट करण्यात येणार असून, यासंदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी उपसुचनेसह मंजूर केला आहे.

३५ वर्षांचा वारसा आणि आधुनिकीकरणाची गरज

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुने मनोरंजनालय म्हणून अप्पु घर ओळखले जाते. मात्र, काळाच्या ओघात येथील बहुतांश राईड्स २० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. जुन्या आणि जीर्ण झालेली यंत्रसामग्री व राईड्समुळे आजची नवी पिढी याकडे आकर्षित होत नसल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, ज्याचा थेट परिणाम महसुलावर होत होता. बाजारात येत असलेल्या नव्या पर्यटन स्थळांशी स्पर्धा करणे कठीण झाल्यामुळे अप्पु घराचे संपूर्ण आधुनिकीकरण करणे काळाची गरज बनले होते.

कोरोना काळातील अडचणी अन् दोन वर्षांची मुदतवाढ

कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात १६ मार्च २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीत अप्पुघर बंद ठेवावे लागले होते. या कालावधीत चालकाला झालेले व्यावसायिक नुकसान व अटी-शर्तीनुसार भाडेदरात वाढ करून, करार संपण्याच्या कालावधीनंतर अतिरिक्त २ वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. हाच अत्यंत महत्त्वाचा विषय स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी योग्य त्या उपसुचनांसह मंजूर केला आहे.

काय असणार आहे नवीन प्रकल्पात?

💮मे. पुष्पक अम्युझमेंटच्या माध्यमातून या प्रकल्पात तब्बल १८ कोटी ६० लाखांची खासगी गुंतवणूक केली जाणार आहे.

💮आधुनिक राईड्स आणि आकर्षणे:* पार्कमध्ये लॉग् फ्ल्युम (पाण्यावरील घसरगुंडी), फ्लॉइंग सिनेमा, ३६०° इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेझ व इन्फिनिटी टनल, नायगारा कृत्रिम धबधबा, किड्स ट्रॅफिक पार्क, आर्केड गेम्स, एआर-व्हीआर झोन आणि इंटरॅक्टिव्ह सेल्फी झोन यांसारख्या अत्याधुनिक व थरारक राईड्सची भर पडणार आहे.

💮सर्वसमावेशक सुविधा:* पार्कचे ‘नेचर थीम’ व ‘किड्स थीम’वर आधारित सुशोभीकरण केले जाणार असून, डिजिटल तिकीट प्रणाली, क्यू मॅनेजमेंट, स्मार्ट पार्किंग, आधुनिक फूड कोर्ट, पिण्याच्या पाण्याची व ड्रेनेजची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे.

💮सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य:* नागरिकांच्या सुरक्षेसाठी फायर सेफ्टी, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, आपत्कालीन यंत्रणा, स्ट्रक्चरल सेफ्टी, अतिथी विमा (Guest Insurance) आणि सार्वजनिक दायित्व विम्यासह सर्व मानकांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

“हा संपूर्ण प्रकल्प पुढील १२ ते १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या करारानुसार पहिल्या वर्षी १०% आणि त्यानंतर दरवर्षी ५% वार्षिक भाडेवाढ महापालिकेला मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये मोठी भर पडणार असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन व्यवसायांना चालना मिळणार आहे”.

– अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ
Next Article वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?