Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»१९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ
पिंपरी चिंचवड

१९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन; जिल्हाभरातील ४०० हून अधिक कॅरमपटूंचा सहभाग

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६चा शुभारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

चिंचवड येथील कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी या ठिकाणी दि. २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ४०० हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले असून, खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

कॅरम हा बौद्धिक क्षमता, एकाग्रता, संयम आणि अचूकतेची कसोटी पाहणारा खेळ आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील नवोदित आणि गुणवंत खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील कौशल्याला चालना देणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्या खेळाडूंना एकूण ३ लाख ५६ हजार रुपयांची रोख पारितोषिके तसेच आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्यासह जिल्हाभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कॅरम हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकाग्रता, संयम, अचूकता आणि निर्णयक्षमता विकसित करणारा खेळ आहे. महापौर चषक कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील आणि जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळते, स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळते. सर्व स्पर्धकांनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे.”

……. रवी लांडगे.महापौर. पिंपरी चिंचवड 

“कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृती जपणारी ही स्पर्धा त्यांच्या क्रीडाप्रेमाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी वारसा पुढे नेणारी आहे. महापौर चषकाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना समान संधी मिळत आहे. अशा स्पर्धांमधून भविष्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.”

……. भाऊसाहेब भोईर.नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते श.पिंपरी चिंचवड 

 

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटनेवरून रोहित पवार आक्रमक
Next Article शहराच्या पर्यटनाला मिळणार नवी ओळख; ‘अप्पु घर’ होणार हायटेक : – अभिषेक बारणे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?