अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी…..बीड येथील प्रसिद्ध आदित्य बहुउद्देशीय संस्थेचे आदित्य आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे गुरुपौर्णिमा – २०२६ निमित्त “कथा-कथन स्पर्धा” मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत साकुरी तालुका राहाता जिल्हा अहिल्या नगर येथील रहिवाशी असणारी कु. साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे या BAMS तृतीय वर्षाला शिकणाऱ्या या मुलीने आपल्या ओघवत्या वाणीने आणि प्रभावी कथन शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला.
अभ्यासात हुशार असण्याबरोबरच साक्षी सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. तिची वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि सादरीकरणाची हातोटी पाहून सर्वांनी कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी सर आणि संचालिका डॉ. आदितीजी सरडा मॅडम यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कु.साक्षी बनसोडे हिच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
