Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

October 3, 2026

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»अहिल्यानगर»नगर-मनमाड महामार्गाच्या कामामुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
अहिल्यानगर

नगर-मनमाड महामार्गाच्या कामामुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राहुरी फॅक्टरीतील पंचर व्यावसायिकाचे दुकान खोदकामामुळे झाले ‘बेट’; तातडीच्या मदतीची मागणी

राहुरी फॅक्टर,प्रतिनिधी. ज्ञानेश्वर बनसोडे.दिं.२६ जुलै : नगर-मनमाड महामार्गावरील रस्ता व पूल बांधकामामुळे रस्त्यालगतच्या लहान व्यावसायिकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विकासकामांमुळे ग्राहकांचा संपर्क तुटल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

राहुरी फॅक्टरी येथील सतीश पांडुरंग साळवे हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून महामार्गालगत पंचर दुरुस्तीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे त्यांचे दुकान चारही बाजूंनी खड्ड्यांनी वेढले गेले असून ते अक्षरशः ‘बेट’ बनले आहे. दुकानापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक नसल्याने ग्राहक येऊ शकत नाहीत.

याबाबत सतीश साळवे म्हणाले, “आम्ही अतिशय गरीब कुटुंब आहोत. दिवसभर दुकानात बसूनही एकही ग्राहक येत नाही. खोदकामामुळे धूळ, चिखल आणि अपघाताचा धोका वाढला आहे. हाताला काम नसल्याने घर चालवणे कठीण झाले असून उपासमारीची वेळ आली आहे.”

महामार्गाचे काम वेगाने सुरू असले तरी अशा लहान व्यावसायिकांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रभावित व्यावसायिकांना तात्पुरता रस्ता उपलब्ध करून देणे, पर्यायी जागेची व्यवस्था करणे किंवा योग्य नुकसानभरपाई देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

विकासकामे महत्त्वाची असली तरी त्याचा फटका गरीब आणि छोट्या व्यावसायिकांना बसू नये, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा विकासाच्या प्रक्रियेत अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसायना नेहवाल यांनी छत्रभुज नरसी स्कूल, पुणे येथे सुजय जयराज यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’ म्हणजेच दिलखुलास संवाद साधला
Next Article आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

आमदार महेश लांडगे यांनी घेतले राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचे आशिर्वाद

September 18, 2026

‘मी सावित्रीबाई फुले बोलते’मधून फुले दाम्पत्याचा जीवनसंघर्ष उलगडला

September 16, 2026

धामोरी येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 3, 20260

निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरील घटना; सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध पिंपरी : रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला…

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?