प्रतिनिधी / दत्तात्रय घुले ……… अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन भैरवनाथ मंदिर चौक या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन प्रारंभ शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ ते सांगता सोहळा शनिवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. यावेळी हरिभक्त परायण भागवताचार्य देवगोपाल महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य असे काल्याच्या किर्तनाने सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सप्ताह किर्तन सोहळ्यात धामोरी व परिसरातील वारकरी सांप्रदायातील श्रीक्षेत्र अडबंगीनाथ भजनी मंडळ, नवनाथ भजमी मंडळ, श्रीसंत सावता महाराज भजनी मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ व मायगाव देवी, मोर्विस, शिरवाडे वाकद येथील भाविक भक्तांनी मोठ्या हजारोंच्या उपस्थिती संख्येने काल्याच्या किर्तनसेवेचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताह सोहळ्यासाठी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जानता राजा मित्र मंडळ, ए-वन मित्र मंडळ,झेड कॉर्नर मित्र मंडळ,
श्री संत सावता मित्र मंडळ, नागेश्वर मित्र मंडळ, आनंदवल्ली मित्र मंडळ, नारायण नगर मित्र मंडळ, नवयुवक मित्र मंडळ व धामोरी न्यू इग्लिश स्कूल विद्यालय व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.