Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»सायना नेहवाल यांनी छत्रभुज नरसी स्कूल, पुणे येथे सुजय जयराज यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’ म्हणजेच दिलखुलास संवाद साधला
पुणे

सायना नेहवाल यांनी छत्रभुज नरसी स्कूल, पुणे येथे सुजय जयराज यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’ म्हणजेच दिलखुलास संवाद साधला

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 26, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी– छत्रभुज नरसी स्कूलच्या Champion Connect ‘चॅम्पियन कनेक्ट’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ज्याअंतर्गत शाळा आपल्या समुदायासाठी विविध क्षेत्रांतील यशस्वी नेते आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना अर्थपूर्ण संवादासाठी आमंत्रित करते, अमनोरा पार्क येथील छत्रभुज नरसीस्कूलमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या आणि माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल (World No. 1) बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासोबत प्रेरणादायी फायरसाइड कन्व्हर्सेशन आयोजित करण्यात आला.

छत्रभुज नरसी स्कूलचे अध्यक्ष श्री. सुजय जयराज यांनी या संवादाचे सूत्रसंचालन केले. या चर्चेत केवळ क्रीडा क्षेत्रातील यशावर भर न देता, सातत्यपूर्ण उत्कृष्टतेमागील विचारसरणी आणि मानसिकतेचा वेध घेण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोर झालेल्या या मनमोकळ्या आणि उत्स्फूर्त संवादात सायना यांनी एक तरुण बॅडमिंटन खेळाडू ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक होण्यापर्यंतच्या आपल्या प्रवासात शिस्त, जिद्द आणि सातत्य यांची भूमिका कशी महत्त्वाची ठरली, याविषयी अनुभव कथन केले.

या संवादाला आणखी एक भावनिक आणि वैयक्तिक पैलू लाभला तो म्हणजे श्री. सुजय जयराज यांचा सायना यांच्या प्रवासाशी असलेला दीर्घकाळाचा संबंध. त्यांनी यापूर्वी सायना यांच्या जीवनावर आधारित गाजलेल्या चरित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे या दोघांमधील संवादातून प्रत्येक यशामागील निर्धार, अपयशातून मिळालेले धडे आणि यशाच्या शिखरावर पोहोचूनही जमिनीवर राहण्याचे महत्त्व याविषयी अनोखे अनुभव समोर आले.

या परस्परसंवादी सत्रामध्ये विद्यार्थी आणि पालकांना सायना यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा संवाद विचारप्रवर्तक, प्रामाणिक आणि अनेकदा हलकाफुलका ठरला. तणावाचा सामना कसा करावा, अपयशावर कशी मात करावी आणि आत्मविश्वास कसा निर्माण करावा अशा विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तर देताना सायना यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित व्यावहारिक धडे दिले, जे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले.

या सत्रानंतर सायना यांनी संपूर्ण कॅम्पसमधील विद्यार्थ्यांशी, विशेषतः बॅडमिंटन कोर्टवर, प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना उत्सुकतेने सामोरे जाण्याचा, आपल्या ध्येयासाठी शिस्तबद्ध राहण्याचा आणि क्रीडा, शिक्षण किंवा जीवनात कोणतेही अर्थपूर्ण यश हे झटपट मिळत नसून सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच घडते, याची जाणीव करून दिली.

यावेळी बोलताना छत्रभुज नरसी स्कूलचे अध्यक्ष श्री. सुजय जयराज म्हणाले, “आजच्या काळात तरुणांभोवती अनेकदा केवळ अंतिमयशाच्या कथा मांडल्या जातात. अशा वेळी या प्रकारचे संवाद वेगळा दृष्टिकोन देतात. प्रत्येक मोठे यश हे असंख्य साध्या दिवसांतील मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण शिकण्याच्या प्रक्रियेवर उभे असते, याची ते आठवण करून देतात.

कष्टाशिवाय उत्तुंग यश मिळतं नाही ….. सायना नेहवाल

कष्टाशिवाय उत्तुंग यश मिळतं नाही. एखाद्या खेळाडू जरी हुशार असला तरी त्याच्याकडे यश गाठण्याची जिद्द हवी आणि प्रामाणिक कष्ट हवेत तरच तो मोठे यश मिळवू शकतो आणि देशाचे नाव उंचावू शकतो , असे मत ऑलंपिक बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने पुण्यात व्यक्त केले.तसेच जर मुलांना मोठे यश मिळविताना पालकांना पहायचे असले तर पालकांनी मुलांना शिस्त लावणे महत्वाचे आहे तसेच मुलांना मनाने खंबीर बनवणे संयमी बनवणे महत्वाचे आहे, असेही सायना नेहवाल म्हणाली.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव
Next Article नगर-मनमाड महामार्गाच्या कामामुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?