Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पंढरपूर»आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा
पंढरपूर

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस

पंढरपूर प्रतिनिधी : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलविण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

छत्रपती संभाजीनगर येथील भाविक बाळू आसाराम पडूळ (वय 54) हे दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे पाठवले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा ईसीजी काढण्यात आला. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूरला पुढील उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हृदयरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

दरम्यान, रुग्ण बाळू आसाराम पडूळ यांना एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूर विमानतळावर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांकडून रुग्णाच्या उपचाराबत माहिती घेतली व आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे गंभीर रुग्णांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य झाले आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनगर-मनमाड महामार्गाच्या कामामुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
Next Article श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

July 26, 2026

संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?