Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पंढरपूर»वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप

पंढरपूर, दि.२४ जुलै : चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी आपल्या आई वडिलांप्रमाणे भक्तीभावाने थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा केली आणि त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारताच्या युवा शक्तीचे चित्र, भारत आणि महाराष्ट्र धर्म पाहायला मिळतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पंचायत समिती, पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे आयोजित ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सारख्या पुरोगामी आणि भक्ती मार्गाची समृद्ध परंपरा असलेल्या या राज्यात वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने २०१६ पासून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा निर्मल वारी उपक्रम सुरु केला आणि २०१७ पासून राज्याच्या अर्थसंकल्पात आणून जिल्हा प्रशासन आणि सहयोग संस्था माध्यमातून वारी निर्मल वारी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शौचालय, स्नानगृह, स्वच्छता आदी व्यवस्था सुविधा सुरु केल्या. वारकऱ्यामध्ये विठू माऊली असल्याने त्याची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य मानून या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत इतर दिंड्याकरिता शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. वारी दरम्यान १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर करण्यात आले. ५ हजार फिरती शौचालये देण्यात आली. वारीला निर्मलवारी करणारे स्वच्छतादूत हे देवदूतच आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यात वारीच्या अनुषंगाने अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले असून याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पंढरपूर येथील वाळवंट स्वच्छ करुन चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ करण्याच्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ३० ते ३५ लाख वारकरी पंढरपूर येथे आल्यानंतरही संपूर्ण पंढरपूर स्वच्छ दिसत आहे. वारीचा कालावधी संपल्यानंतरही पंढरपूर असेच स्वच्छ राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकप्रतिनिधी, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, निर्मलवारीमध्ये विविध परंपरांच्या माध्यमातून जनजागृती करणारे कलावंत तसेच वारी यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व घटकांच्या कामाचे कौतुक केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, वारीमध्ये वारकऱ्यांना सुविधा देताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. चरणसेवा उपक्रमासोबतच मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये, हिरकणी कक्ष, रुग्णालय, शौचालय, स्नानगृह, जर्मन हँगर, मोबाईल चार्जिंग वाहन आदी उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यांना हक्काच्या मुक्कामाचे ठिकाण उपलब्ध करुन देण्यात आल्याबद्दल वारकरी समाधान व्यक्त करीत होते. यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सेवा भावी संस्था, स्वच्छता दूत, नागरिक यांनी मनापासून योगदान दिले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जबाबदारी न समजता सेवा म्हणून कार्य केले. यामुळे ही संपूर्ण वारी साथीच्या रोगापासून मुक्त झाली आहे, वाळवंट व चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यात आली असून एकूणच संपूर्ण पंढरी स्वच्छ करुन वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आली आहे. आषाढीवारीमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होवून राज्य शासनाच्या सर्व सेवांचा लाभ घेतला आहे, असेही गोरे म्हणाले.

आषाढीवारीमध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. सातारा, सोलापूर जिल्ह्यात १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर, ७ लाख ८० चौरस फूट जलरोधक मंडप उभारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ भारत मोहिमेत महाराष्ट्र प्रथम स्थानी आल्याबद्दल संचालक शेखर रौंदळ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर व सेवाभावी संस्था आणि आषाढी वारीतील स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६’ बोधचिन्हाचे अनावरणही याप्रसंगी करण्यात आले.

कार्यक्रमात ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचे माहितीपट दाखविण्यात आले. कार्यक्रमाला आमदार राजेंद्र राऊत, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, नारायण पाटील, नंदकिशोर महाजन, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये महिला कृषी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
Next Article संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

July 26, 2026

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

July 26, 2026

संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?