Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»छत्रपती संभाजी नगर»सोनम वांगचुक आंदोलनावरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वैजापूरात आक्रोश मोर्चा
छत्रपती संभाजी नगर

सोनम वांगचुक आंदोलनावरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वैजापूरात आक्रोश मोर्चा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वैजापूर | प्रतिनिधी : (विजयकुमार मोकळे)….नीट, सीईटीसह विविध स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटीच्या घटनांचा निषेध आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारने कथित दडपशाही केल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ वैजापूर शहरात सोमवारी (दि. 20 जुलै) आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंबेडकरवादी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, वैजापूर शहर व ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने हा मोर्चा पार पडला.

मोर्चाची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा कथित खेळ तातडीने थांबवावा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील कथित दडपशाहीचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण न्हावड यांना सादर केले.

या मोर्चात बाबासाहेब पगारे, सखाराम शिनगारे, राजेंद्र बागुल, कवी-गायक शाहीर विजय मोकळे करंजगावकर, प्रशांत त्रिभुवन, संजय पगारे, सिद्धार्थ बागुल, राहुल संत, जुबेर चाऊस, प्रा. डॉ. आबासाहेब कसबे, सागर सोनवणे, बुद्धभूषण साळवे, साहेबराव पडवळ, जीवन पठारे, श्रीकांत जाधव, भीमराव महाले, राहुल साळवे, नामदेव त्रिभुवन यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Post Views: 29
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते ‘अजातशत्रू – अजित दादा’ काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण….’नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या शिलेदार मंचावरून हजारो कलाकारांनी दाखवला आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध

September 15, 2026

‘आदर्श शाळे’च्या यशाला सलाम!

September 11, 2026

वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!

September 7, 2026

महाकवी वामनदादांच्या लोककाव्याची परंपरा जपणारा जनमाणसांचा लोककवी : प्रशांत मोरे

August 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?