Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शिरगाव परंदवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

पिंपरी : गौरी-गणपती सणोत्सवानिमित्त घरातील एकविरा देवीच्या मूर्तीला चढविण्यात आलेले सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह चोरी केल्याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली. तिच्याकडून ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह, अंदाजे २ लाख ८४ हजार ८४७ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत २६ सप्टेंबर २०२६ रोजी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी घरातील गौरी-गणपती सणोत्सवानिमित्त एकविरा देवीच्या मूर्तीला घातलेले ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह चोरी झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार गु.र.क्र. २८०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेची कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केली असता तिच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर गजरा सातप्पा कांबळे (वय ४५, रा. जिजामाता चौकाजवळ, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे) हिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तपासादरम्यान आरोपी महिलेने चोरी केलेले ३०.५४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह पोलिसांनी हस्तगत केले. या मुद्देमालाची किंमत २,८४,८४७ रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, पोलीस हवालदार किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे, तसेच पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड आणि सागर कोळी यांच्या पथकाचा सहभाग होता.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleखुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक
Next Article पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026

चैन स्नॅचिंगचा तपास पोहोचला पुरंदरपर्यंत; दोन गुन्ह्यांचा उलगडा

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?