Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मातंग समाजाच्या ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरणासाठी आंदोलन; तात्काळ अंमलबजावणीची मागणी
पिंपरी चिंचवड

मातंग समाजाच्या ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरणासाठी आंदोलन; तात्काळ अंमलबजावणीची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिंचवड, दि. १४ जुलै २०२६ : अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार मातंग समाजाचे ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मातंग समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर करून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

यावेळी बोलताना युवराज दाखले यांनी सांगितले की, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी उप-वर्गीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना न्याय मिळण्यासाठी उप-वर्गीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. पंजाब, तमिळनाडूसह काही राज्यांमध्ये अशा प्रकारची अंमलबजावणी झाली असून महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या बीदर समितीचा अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे त्याआधारे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनामध्ये सोशल मीडियावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह टीका-टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, ‘आर्टी’ (ARTI)चे मुख्य कार्यालय हाप्किन महामंडळाच्या पाच एकर जागेवर उभारावे, २०१२ मध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार संबंधित जागा हस्तांतरित करावी, पिंपरी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात धमकी देणाऱ्यांवर तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्यांचाही समावेश होता.

तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दाखले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उप-वर्गीकरणाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन शासन आदेश जारी करावा, अशी मागणी आंदोलनात सहभागी शेकडो पदाधिकाऱ्यांनी केली.

आंदोलनापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे पुलाजवळ असलेल्या महाराणा प्रताप आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या आंदोलनात हिंदू मातंग एकता सेना, शिवशाही शासन पक्षासह विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. युवराज दाखले यांनी नायब तहसीलदारांना सर्व मागण्या सविस्तरपणे मांडल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटना : प्रकल्प प्रमुख व सेफ्टी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Next Article शहराच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’: स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रभाग अध्यक्षांना दिले नियोजनाचे कानमंत्र
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?