Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शहराच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’: स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रभाग अध्यक्षांना दिले नियोजनाचे कानमंत्र
पिंपरी चिंचवड

शहराच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’: स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रभाग अध्यक्षांना दिले नियोजनाचे कानमंत्र

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी नवा संकल्प; प्रभाग अध्यक्षांच्या कामकाजाला मिळणार गती – अभिषेक बारणे

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात अधिक गती आणण्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभाग समिती अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतींच्या दालनात पार पडली. आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे आणि आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी नवनियुक्त प्रभाग समिती अध्यक्षांना कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शहराच्या विकासाची ध्येयधोरणे आणि लोकहिताची कामे गतीने पूर्ण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस राजगड (प्रभाग ‘अ’) समिती अध्यक्ष अर्चना करांडे, सिंहगड (प्रभाग ‘ब’) अध्यक्ष मंदार देशपांडे, विजयदुर्ग (प्रभाग ‘क’) अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, देवगिरी (प्रभाग ‘ड’) अध्यक्ष सविता खुळे, शिवनेरी (प्रभाग ‘इ’) अध्यक्ष अर्चना सस्ते, तोरणा (प्रभाग ‘फ’) अध्यक्ष शिवानी नरळे, पुरंदर (प्रभाग ‘ग’) अध्यक्ष मनिषा पवार, प्रतापगड (प्रभाग ‘ह’) अध्यक्ष तृप्ती कांबळे, रायगड (प्रभाग ‘ज’) अध्यक्ष आरती चोंधे आणि लोहगड (प्रभाग ‘ल’) अध्यक्ष रेखा देवकर उपस्थित होते.

प्रभागाच्या विकासासह नागरिकांचे आरोग्य देखील महत्वाचे .

बैठकीत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रभाग अध्यक्षांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, नवनियुक्त प्रभाग अध्यक्षांनी पहिल्या आठवड्यात संपूर्ण प्रभागाची पाहणी करावी. यामध्ये नागरिकांचे आरोग्य, रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती, नाले दुरुस्ती, नाल्यावरील अतिक्रमण काढणे, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहराच्या विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असून, प्रत्येक प्रभागात ‘हॉकर झोन’ आणि ‘पे-अँड-पार्क’साठी जागा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रशासकीय कामांना मिळणार गती…

अभिषेक बारणे यांनी प्रभागातील अत्यावश्यक नवीन कामे अंदाजपत्रकात तातडीने समाविष्ट करून घेण्यावर भर दिला. यामध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलला भेट देऊन ‘हेल्प डेस्क’ तयार करणे, मोठ्या सोसायट्यांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची पाहणी करणे आणि शहरातील ३२ प्रभागांत बोरवेलच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याची (Recharging) मोहीम राबवण्याचे आदेश दिले. तसेच प्रभाग कार्यालयांत नागरिक सुविधा केंद्र, आधार कार्ड आणि एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पर्यावरण आणि शैक्षणिक सुधारणांवर भर…

महापालिकेच्या शाळांना भेटी देऊन तिथल्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे, वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करणे आणि झाडांच्या बुंध्याभोवतीचे कॉंक्रिट काढून झाडे मोकळी करण्यावर भर दिला. पुलांखालील ‘स्नॅक्स सेंटर्स’च्या ठिकाणची स्वच्छता राखून तिथे शौचालय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश देत, प्रभाग अध्यक्षांनी पर्यावरणाचे रक्षण आणि बचतीसाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना सभापती अभिषेक बारणे यांनी केली.

या बैठकीत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे प्रभाग समिती अध्यक्षांच्या कामकाजात एक नवीन दिशा मिळाली असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पदाधिकारी आता अधिक जोमाने काम करण्यास सज्ज झाले आहेत. महापौर रवी लांडगे यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभागातील विकासकामांसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

“आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यामध्ये प्रभाग अध्यक्षांना दिलेल्या नियोजनाच्या कानमंत्रामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल. शहराच्या विकासाची ध्येयधोरणे आणि लोकहिताची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी हे पदाधिकारी आता सज्ज झाले असून, यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच गती मिळेल.”

– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमातंग समाजाच्या ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरणासाठी आंदोलन; तात्काळ अंमलबजावणीची मागणी
Next Article पिंपरी-चिंचवडमधील निकृष्ट रस्त्यांच्या चौकशीची मागणी; खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – मारुती भापकर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?